-
ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकेरने २०२४ पॅरिस ऑलिम्पिक मध्ये तिच्या उत्कृष्ट कामगिरीने इतिहास रचला आहे.
-
ऑलिम्पिक मध्ये दोन कांस्यपदके जिंकणारी मनू सध्या अनेक ब्रँडच्या जाहिरातींमधून मोठी कमाई करत आहे. जाणून घेऊया मनूच्या एकूण संपत्तीबद्दल.
-
मनूचा शूटिंगमधील प्रवास तिच्या वडिलांकडून दीड लाख रुपयांच्या गुंतवणुकीपासून सुरू झाला.
-
रीपोर्टसनुसार, मनूची कमाई प्रामुख्याने तिच्या व्यावसायिक नेमबाजी कारकीर्दीतून आणि स्पोर्ट्स ब्रँडच्या जाहिरातींमधून येते.
-
मनूने ‘नथिंग इंडिया’ आणि ‘परफॉर्मॅक्स’ सारख्या मोठ्या ब्रँडसह कामं केलं आहे. भारतात महिला क्रीडापटू कोणत्याही ब्रॅंडसाठी सहसा जाहिरातींमधून ८ ते ३० लाख रुपये कमावतात.
-
मात्र, मनूची ब्रँड व्हॅल्यू इतर महिला क्रीडापटूपेक्षा अधिक म्हणजे अंदाजे १.५ कोटी रुपये आहे.
-
मनूच्या ऑलिम्पिक तयारीसाठी ‘टार्गेट ऑलिम्पिक पोडियम स्कीम’ मार्फत तिला १२ लाख रुपये देखील मिळतात.
-
याशिवाय, मनूला ‘अॅन्युअल कॅलेंडर फॉर ट्रेनिंग अँड कॉम्पिटिशन’ कडून एकूण १५ लाखांची आर्थिक मदत मिळते. ज्याने तिच्या प्रशिक्षण आणि स्पर्धेच्या खर्चात मदत होते.
-
मनूच्या एकूण संपत्तीबद्दल बोलायचे झाले तर, मोठ्या ब्रँडच्या जाहिरातींमधून कमाई करत आता मनूची अंदाजे संपत्ती १२ कोटी रुपये आहे. (सर्व फोटो: मनू भाकेर/इन्स्टाग्राम)

शेतकऱ्याचा नांगरणीसाठी भन्नाट जुगाड; वेळ आणि कष्ट वाचविण्यासाठी बैलांशिवाय हा जुगाड नक्की करा; VIDEO पाहून व्हाल अवाक्