-
पंजाबमधील रहिवासी असलेल्या हरमिलन बैंसने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारतासाठी पदकं जिंकली आहेत. मात्र, आता तिने खेळ सोडून मॉडेल बनण्याचा विचार सुरू केला आहे.
-
हरमिलन बैन्स ही भारतीय लांब पल्ल्याची (Long Distance) धावपटू आहे. गेल्या वर्षी चीनमधील हांगझोऊ येथे झालेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत तिने ८०० मीटर आणि १५०० मीटरमध्ये रौप्यपदक जिंकले होते. या दोन स्पर्धांमध्ये एकाच वेळी पदक जिंकणारी ती पहिली भारतीय महिला खेळाडू ठरली होती.
-
आशियाई खेळानंतर तिचे लक्ष पूर्णपणे ऑलिम्पिकवर केंद्रित झाले. ऑलिम्पिकमध्ये सहभागी होण्यासाठी ती खूप मेहनत घेत होती. मात्र, दुखापतीने तिची ऑलिम्पिकमध्ये जाण्याची संधी हिरावून घेतली. पॅरिस ऑलिम्पिकसाठी ती पात्र ठरू शकली नाही.
-
ऑलिम्पिकमध्ये जाण्याचे तिचे स्वप्न भंगल्याने हरमिलन नैराश्यात गेली. तिच्या मनात आत्महत्येचे विचार येऊ लागले. ती ॲथलेटिक्स कायमचे सोडण्याचा विचार करू लागली. हा काळ हरमलीनसाठी खूप कठीण होता.
-
हरमिलनने सांगितले की तिला ‘ग्रेड 2B’ हॅमस्ट्रिंग (कंबरेजवळील सांधा) ब्रेक झाले आहे. इतक्या गंभीर दुखापतीमुळे तिची ॲथलेटिक्स कारकीर्द अनिश्चित आहे हे तिला माहीत आहे. दुसऱ्या चेकपनंतर शस्त्रक्रिया करायची की नाही याचा निर्णय ती घेईल. शस्त्रक्रियेनंतर, हरमिलनला सामान्य जॉगिंग करण्यासाठी ९-१० महिने लागतील.
-
या कारणास्तव तिने आता स्वत:साठी करिअरच्या इतर पर्यायांचा विचार सुरू केला आहे. हरमिलनने पीटीआयला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, आता वयाच्या २६ व्या वर्षी ती खेळ क्षेत्र सोडून मॉडेलिंग करण्याचा विचार करत आहे. मॉडेलिंग हा तिच्यासाठी करिअरचा पर्याय आहे.
-
हरमिलन दिसायला खूप सुंदर आहे आणि तिचे सोशल मीडियावरील फोटो पाहता ती एखाद्या मॉडेलसारखीच दिसते. तिचे इंस्टाग्रामवर जवळपास ३ लाख फॉलोअर्स आहेत.
-
तिच्या रनिंगसह तिची स्टाईल आणि सौंदर्यही चाहत्यांना आवडते. (सर्व फोटो साभार- हरमिलन बैन्स/इंस्टाग्राम)

दिवाळीआधीच ‘या’ ३ राशी होतील कोट्यधीश! शुक्राच्या गोचरामुळे तिजोरीत पैशांची वाढ तर करिअर धरणार सुस्साट वेग