-
क्रिकेटपेक्षा खास – या दोन स्टार मुलींचा प्रभावशाली प्रवास!
भारतात क्रिकेट हा एक खेळ नसून भावना आहे. पण क्रिकेटपटूंच्या मुलींकडे पाहताना लोक केवळ त्यांच्या सौंदर्यावर नाही, तर त्यांचं शिक्षण, विचार व करिअर यांवरसुद्धा लक्ष ठेवतात. सचिन तेंडुलकरची मुलगी सारा तेंडुलकर आणि सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली यांचा यशस्वी प्रवास हेच सिद्ध करतो. (छायाचित्र स्रोत: @sachintendulkar/instagram) -
ग्लॅमरबरोबर बुद्धीचंही नाणं खणखणतं!
सना आणि सारा या दोघीही केवळ सुंदरच नाहीत, तर शिक्षणातही त्या पुढे आहेत. त्या आपल्या कामगिरीमुळे आजच्या तरुणांसाठी आदर्श बनल्या आहेत. त्यांची जिद्द आणि ध्येयनिश्चिती पाहून अनेकांना प्रेरणा मिळते. (छायाचित्र स्रोत: @souravganguly/instagram) -
सारा तेंडुलकरचं शिक्षण
१२ ऑक्टोबर १९९७ रोजी मुंबईत जन्मलेल्या सारा तेंडुलकर हिनं धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केलं. ही शाळा देशातील एक आघाडीची शाळा मानली जाते. (छायाचित्र स्रोत: @sachintendulkar/instagram) -
परदेशात शिक्षण
साराने युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL)मधून बायोमेडिकल सायन्सेसमध्ये पदवी घेतली. त्यानंतर तिनं क्लिनिकल आणि पब्लिक हेल्थ न्यूट्रिशन या विषयात मास्टर्सही केलं. तिचं अभ्यास क्षेत्र खूपच सखोल आणि महत्त्वपूर्ण आहे. (छायाचित्र स्रोत: @sachintendulkar/instagram) -
आईची प्रेरणा
साराची आई अंजली तेंडुलकर वैद्यकीय क्षेत्रात असल्यामुळे साराला त्याच वाटेवर जाण्याची प्रेरणा मिळाली. आज सारा AfN-नोंदणीकृत असोसिएट न्यूट्रिशनिस्ट (ANutr) म्हणून काम करतानाच आरोग्यविषयक मार्गदर्शनही करीत आहे. (छायाचित्र स्रोत: @sachintendulkar/instagram) -
फक्त शिक्षणच नाही, सोशल मीडियावरही ‘स्टार’ आहे सारा!
सारा तेंडुलकर केवळ अभ्यासातच हुशार नाही, तर ती एक लोकप्रिय सोशल मीडिया स्टारही आहे. तिनं अजिओ लक्ससारख्या प्रसिद्ध ब्रँडसाठी मॉडेलिंग केलं असून, तिच्या इन्स्टाग्रामवर तब्बल ८.२ दशलक्षहून अधिक फॉलोअर्स आहेत. विविध ब्रँड्ससोबत ती जाहिरात क्षेत्रातही सक्रिय आहे. (छायाचित्र स्रोत: @sachintendulkar/instagram)
-
स्वतःचा व्यवसाय, स्वतःची ओळख!
सारानं फक्त इतरांसाठी काम केलं नाही, तर तिनं स्वतःचा एक ब्रँडही तयार केला. Sara Tendulkar Shop नावाच्या ऑनलाइन स्टोअरमधून ती खास वैयक्तिकृत ‘वार्षिक प्लॅनर्स’ विकते. या प्लॅनर्सची किंमत ₹२,४९९ असून, तिचा व्यवसाय चांगल्या गतीने वाढतो आहे. (छायाचित्र स्रोत: @sachintendulkar/instagram) -
सना गांगुली – कोलकात्यातून लंडनपर्यंतचा प्रवास
सौरव गांगुलीची मुलगी सना गांगुली हिचा जन्म २००१ साली कोलकात्यात झाला. तिनं आपलं शालेय शिक्षण कोलकात्यातील प्रसिद्ध लोरेटो हाऊस स्कूलमधून पूर्ण केलं. शिक्षणात ती कायम आघाडीवर राहिली आहे. (छायाचित्र स्रोत: @souravganguly/instagram) -
यूसीएलमध्ये अर्थशास्त्राचं शिक्षण
शालेय शिक्षणानंतर सनानं युनिव्हर्सिटी कॉलेज लंडन (UCL) या नामांकित विद्यापीठात प्रवेश घेतला. तिथे तिनं अर्थशास्त्र या विषयात शिक्षण घेतलं आणि आपला शैक्षणिक प्रवास पुढे सुरू ठेवला. (छायाचित्र स्रोत: @souravganguly/instagram) -
इंटर्नशिप्समधून घेतला कॉर्पोरेट अनुभव
फक्त पुस्तकं वाचण्यात रमून न जाता, सना गांगुलीनं जगभरातील मोठमोठ्या कंपन्यांमध्ये इंटर्नशिप्स केल्या. एचएसबीसी, केपीएमजी, गोल्डमन सॅक्स, बार्कलेज व आयसीआयसीआय अशा दिग्गज कंपन्यांमध्ये काम करून, तिनं उद्योगजगतातला प्रत्यक्ष अनुभव मिळवला. (छायाचित्र स्रोत: @souravganguly/instagram) -
सामाजिक उद्योजकतेतही सना आघाडीवर!
सना गांगुली केवळ कॉर्पोरेट क्षेत्रातच नाही, तर सामाजिक उद्योजकतेतही सक्रिय आहे. ती Enactus या विद्यार्थ्यांच्या जागतिक संघटनेशी जोडलेली होती, जिथे तिनं नेतृत्व, टीमवर्क आणि व्यावसायिक समस्यांवर काम करण्याचा खरा अनुभव घेतला. (छायाचित्र स्रोत: @souravganguly/instagram) -
सना गांगुलीचा कॉर्पोरेट करिअर – लंडनपर्यंतचा टप्पा
सनानं तिचा कॉर्पोरेट प्रवास इंटर्नशिपद्वारे PWC (प्राइसवॉटरहाऊसकूपर्स)मधून सुरू केला. त्यानंतर तिनं डेलॉइटमध्येही काम केलं. सध्या ती लंडनमधील INNOVERV या कंपनीत ज्युनियर कन्सल्टंट म्हणून काम करते आणि तिच्या भूमिकेमुळे कंपनीत तिनं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं आहे. (छायाचित्र स्रोत: @souravganguly/instagram)

Shambhuraj Desai : “गद्दार कुणाला म्हणतो रे?” ; अनिल परब विरुद्ध शंभूराज देसाईंचा सभागृहातला राडा काय? मंत्रिमहोदयांनी सगळंच सांगितलं