-
नागपूरच्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने इतिहास घडवला आहे. तिने जॉर्जियातील बातुमी येथे पार पडलेल्या बुद्धिबळ विश्वचषक स्पर्धेत अंतिम फेरीत भारताच्या कोनेरू हम्पीला पराभूत करत ऐतिहासिक कामगिरी केली आहे. (फोटो-एक्स)
-
तिने FIDE विश्वचषक स्पर्धेतील अंतिम सामन्यात कोनेरू हम्पीवर टायब्रेकर फेरीत विजय मिळवत भारताची पहिली महिला विश्वविजेती होण्याचा मान पटकावला. (फोटो- एक्स)
-
दिव्या देशमुख ही मुळची नागपूरची आहे. तिला लहानपणापासून बॅडमिंटन खेळायला आवडायचं. पण तिच्या आई-वडिलांनी तिला बुद्धिबळ खेळण्यासाठी प्रोत्साहित केलं. सुरूवातीला तिला बुद्धिबळ खेळायचं नव्हतं. पण काही वेळानंतर तिला हा खेळ आवडू लागला. (फोटो- एक्स)
-
तिचे आई-वडिल जितेंद्र देशमुख आणि नम्रता देशमुख हे डॉक्टर आहेत. दिव्याने आपलं प्राथमिक शिक्षण भवन्स भगवानदास पुरोहित विद्यामंदीर येथून पूर्ण केलं आहे. (फोटो-एक्स)
-
दिव्याने २०२४ टाटा स्टील इंडिया बुद्धिबळ स्पर्धा जिंकून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता. यासह तिने बुद्धिबळ ऑलिम्पियाडमध्ये २ सुवर्णपदकं पटकावली होती. (फोटो- एक्स)
-
दिव्या देशमुख ही सध्या बुद्धिबळ खेळातील वर्ल्ड ज्यूनिअर रँकिंगमध्ये अव्वल स्थानी आहे. स्पर्धा जिंकण्यासह आणखी महत्वाची गोष्ट म्हणजे, संपूर्ण स्पर्धेत तिने एकही सामना गमावलेला नाही. (फोटो- एक्स)
-
दिव्याने महिला विश्वचषक स्पर्धेतील अंतिम फेरीत पोहोचणारी पहिलीच भारतीय महिला खेळाडू होण्याचा मान पटकावला. (फोटो- एक्स)

“गरिबासाठी कोण नाही पण देव असतो” अवघ्या ५ सेकंदात कार चालकाला देवानं दिलं कर्माचं फळ, असं काय घडलं? पाहा VIDEO