-
कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रम गाठण्याच्या जवळ: इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या आणि अंतिम कसोटीत भारतीय कर्णधार शुभमन गिलसमोर अनेक विक्रम मोडण्याची सुवर्णसंधी आहे. सध्याच्या फॉर्मला पाहता, गिल ओव्हलच्या मैदानात काही ऐतिहासिक फलंदाजी विक्रम आपल्या नावे करू शकतो. तो महान फलंदाज सुनील गावस्कर, सर डॉन ब्रॅडमन आणि विराट कोहली यांच्यासारख्या दिग्गजांच्या विक्रमांच्या अत्यंत जवळ पोहोचला आहे.
-
कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरणार: शुभमन गिल पाचव्या कसोटीत फक्त ८९ धावा केल्यास, तो कसोटी मालिकेत कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारा फलंदाज बनेल. सध्या त्याच्या ७२२ धावा आहेत, ज्यात ४ शतके आहेत.
-
आतापर्यंत केलेल्या धावा : १९३६-३७ मध्ये डॉन ब्रॅडमनने अॅशेस मालिकेत ८१० धावा केल्या होत्या, गिलने आतापर्यंत ७२२ धावा केल्या असून तो ८८ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडण्याच्या अगदी जवळ आहे.
-
शुभमन गिल विक्रमच्या दिशेने : शुभमन गिल सध्या केवळ कर्णधार म्हणून विक्रमाच्या दिशेने नव्हे, तर कसोटी इतिहासातील सर्वात मोठ्या वैयक्तिक धावसंख्येच्या विक्रमाकडेही वाटचाल करत आहे. १९३० मध्ये डॉन ब्रॅडमनने इंग्लंडविरुद्ध ५ कसोट्यांच्या मालिकेत ७ डावांमध्ये १३९.१४ च्या सरासरीने ९७४ धावा केल्या होत्या. आजही हा विक्रम अभेद्य आहे. गिलने या मालिकेत आतापर्यंत ७२२ धावा केल्या असून, त्याला ब्रॅडमनचा विक्रम मोडण्यासाठी आणखी २५३ धावांची गरज आहे. त्याच्या सातत्यपूर्ण फॉर्मला पाहता, हा ऐतिहासिक विक्रमही गिलच्या बॅटमधून मोडण्याची शक्यता आहे.
-
एका मालिकेत सर्वाधिक शतकांचा विक्रम गिलच्या निशाण्यावर : शुभमन गिलने इंग्लंडविरुद्धच्या चालू मालिकेत आतापर्यंत चार शतके झळकावली आहेत. ओव्हल कसोटीत दोन्ही डावांत शतके केली, तर तो एका कसोटी मालिकेत सर्वाधिक शतके करण्याचा विक्रम मोडेल. सध्या हा विक्रम वेस्ट इंडिजच्या क्लाईड वॉलकॉटच्या नावावर असून, त्याने १९५५ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच शतके झळकावली होती.
-
गिल सुनील गावस्करच्या विक्रमांच्या जवळ : शुभमन गिल कसोटी मालिकेत भारतीय खेळाडू म्हणून सर्वाधिक धावा करण्याच्या उंबरठ्यावर आहे. त्याला हा विक्रम मोडण्यासाठी फक्त ५३ धावांची गरज आहे. सध्या हा विक्रम सुनील गावस्कर यांच्या नावावर असून त्यांनी १९७०-७१ मध्ये वेस्ट इंडिजविरुद्ध ७७४ धावा केल्या होत्या. याशिवाय, कर्णधार म्हणून सर्वाधिक धावांचा विक्रमही गिल मोडू शकतो. त्यासाठी त्याला केवळ ११ धावा हव्या आहेत. हा विक्रमदेखील गावस्कर यांच्या नावावर असून त्यांनी १९७८-७९ मध्ये ७३२ धावा केल्या होत्या.
-
कोहलीचा विक्रमही गिलच्या टप्प्यावर : शुभमन गिल लवकरच विराट कोहलीचा विक्रम मोडून डब्ल्यूटीसीमध्ये भारतासाठी तिसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरू शकतो. त्याला कोहलीला मागे टाकण्यासाठी फक्त ३ धावांची गरज आहे. गिलने २६ कसोट्यांत २६१५ धावा केल्या असून, कोहलीने ४६ कसोट्यांत २६१७ धावा केल्या आहेत. कोहलीने कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यामुळे गिलला हा विक्रम गाठण्याची संधी सहज उपलब्ध आहे.
-
ख्रिस गेललाही मागे टाकण्याच्या मार्गावर गिल : शुभमन गिल २५ व्या वर्षी सर्वाधिक आंतरराष्ट्रीय शतके करणाऱ्या खेळाडूंच्या यादीत सध्या १८ शतकांसह संयुक्तपणे पाचव्या स्थानावर आहे. त्याने कसोटीत ९, एकदिवसीय सामन्यांत ८ आणि टी-२० मध्ये १ शतक झळकावलं आहे. जर गिलने ओव्हल कसोटीत आणखी एक शतक झळकावलं, तर तो ख्रिस गेलला मागे टाकेल, ज्याचं वयाच्या २५ व्या वर्षी १८ आंतरराष्ट्रीय शतकांचं योगदान होतं.