-
अलिकडेच पैसे लावले जाणाऱ्या ऑनलाइन जुगारावर बंदी आणणारं विधेयक संसदेने मंजुर केलं. ‘ड्रीम ११’ हे भारतीय संघाचे अधिकृत प्रायोजक होते. पण, या विधेयकानंतर ड्रिम ११ ने भारतीय क्रिकेट संघाचं प्रायोजकत्व सोडलं आहे. त्यामुळं आशिया कपपूर्वी बीसीसीआय आता नवा प्रायोजकाच्या शोधात आहे, अशी माहिती बीसीसीआयचे सचिव देवजित सैकिया यांनी दिली आहे. (Photo: AP Photo)
-
दरम्यान, ड्रीम ११ पूर्वी भारतीय क्रिकेट संघाचे सहारा, स्टार इंडिया, ओप्पो आणि बायजूज हे प्रायोजक राहिले आहेत. त्यांची बीसीसीआयबरोबरची भागीदारी का संपूष्टात आली? याबद्दल जाणून घेऊयात… (Photo: Social Media)
-
सहारा इंडिया (२००१ ते २०१३)
सहारा इंडियाची भागीदारी भारतीय संघाबरोबर सर्वाधिक काळ टिकली, जी एकूण ११ वर्षांपर्यंत चालली. २०१० साली सहाराच्या बीसीसीआयबरोबरच्या कराराचं नुतनीकरण करण्यात आलं व त्यांनी प्रत्येक सामन्यासाठी ३.३४ कोटी रूपये दिले. पण, दीर्घकाळ टिकलेली ही भागीदारी अखेर आर्थिक तणावामुळं अचानकपणे संपूष्टात आली. (Photo: Social Media) -
स्टार इंडिया (२०१४-२०१७):
२०१४ मध्ये स्टार इंडियाबरोबर ४ वर्षांचा करार झाला. त्यांनी प्रत्येक द्विपक्षीय सामन्यासाठी सुमारे १.९२ कोटी आणि आयसीसी टूर्नामेंट सामन्यासाठी ६१ लाख इतकी बोली लावली होती. स्टार हे देशातले मोठे नेटवर्क असूनही २०१७ मध्ये ते या करारातून बाहेर पडले व त्यांनी संघाचे प्रायोजक बनण्याऐवजी थेट प्रसारणाच्या हक्कांकडे मोर्चा वळवला. (Photo: Social Media) -
ओप्पो मोबाईल्स इंडिया (२०१७-२०१९):
त्यानंतर ओप्पोने १,०७९ कोटी रुपयांचा पाच वर्षांचा मोठा करार केला – बीसीसीआयने निश्चित केलेल्या मूळ किमतीच्या दुप्पट त्यांनी किमंत मोजली. (Photo: Social Media) -
या लोकप्रिय ब्रँडने प्रत्येक द्विपक्षीय सामन्यासाठी ४.६१ कोटी आणि आयसीसी सामन्यासाठी १.५१ कोटी देण्याचे मान्य केले. दरम्यानच्या काळात कंपनीला आर्थिक आव्हानं आली व ओप्पोने मध्येच प्रायोजकत्व सोडून दिले. (Photo: Indian Express)
-
बायजूज (२०१९-२०२३):
बायजूजने २०१९ मध्ये ५ टक्के अतिरिक्त पुनर्नियुक्ती शुल्क भरले व ओप्पोकडून प्रायोजकत्वाचे हक्क स्वीकारले. (Photo: Social Media) -
या टेक कंपनीने २०२३ पर्यंत हा करार कायम ठेवला परंतु अंतर्गत आर्थिक अडचणी आणि ऑपरेशनल समस्यांना तोंड देत असल्याने त्यांनी माघार घेतली. (File Photo)
-
ड्रीम११ (२०२३-२०२५):
ड्रीम ११ ने ३५८ कोटी रुपयांसह बीसीसीआयबरोबर ३ वर्षांचा करार केला. परंतु तोही आता संपुष्टात आला. ड्रीम ११ च्या जाण्यामुळे टीम इंडियाबाबत दीर्घकालीन प्रायोजकत्व टिकवून ठेवू न शकणाऱ्या प्रायोजकांच्या वाढत्या यादीत भर पडली आहे. (Photo: Social Media) हेही पाहा- Asia Cup: माही भाई नाही, आशिया कपमध्ये कर्णधार म्हणून ‘हा’ दिग्गज नंबर १; सर्वाधिक सामने जिंकणारे टॉप ५ कर्णधार

Donald Trump Fresh Tariff Threat : ‘अमेरिकेच्या टेक कंपन्यांचा सन्मान करा, अन्यथा…’; ट्रम्प यांची पुन्हा टॅरिफ लादण्याची धमकी