-
India Refuse to Accept Asia Cup Trophy from Mohsin Naqvi: भारतीय संघाने आशिया चषक २०२५ च्या अंतिम सामन्यात पाकिस्तानचा ५ विकेट्सने दणदणीत पराभव केला.
-
पण विजेत्या भारतीय संघाने मात्र आशिया चषकाची ट्रॉफी आज म्हणजेच विजयाच्या दिवशी घेण्यास मात्र नकार दिला आहे.
-
भारतीय संघाने आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्ष आणि पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे चेअरमन मोहसीन नक्वी यांच्या हस्ते जेतेपद स्वीकारण्यास नकार दिला.
-
भारताचा कर्णधार सूर्यकुमार यादवने एक्सवर आशिया चषक हातात धरलेला एआय-जनरेटेड फोटो शेअर केला आहे.
-
भारतीय संघाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पंड्याने इन्स्टाग्रामवर एआय-जनरेटेड ट्रॉफीबरोबर हा फोटो शेअर केला आहे.
-
क्रिकेटपटू शुबमन गिलने सोशल मीडियावर एआय-जनरेटेड ट्रॉफीबरोबरचा हा फोटो शेअर केले आहे.
-
क्रिकेटपटू अर्शदीप सिंगने ‘This Is Our Trophy’ असे कॅप्शन देत हा फोटो शेअर केला आहे.
-
क्रिकेटपटू वरूण चक्रवर्तीने पांढऱ्या रंगाचा चहाचा कप बाजूला घेऊन फोटोसाठी खास पोज दिली आहे.
-
(सर्व फोटो सौजन्य : भारतीय क्रिकेटपटू/इन्स्टाग्राम)

Who is Mohsin Naqvi : कोण आहेत मोहसीन नक्वी? भारतीय खेळाडूंनी त्यांच्या हस्ते जेतेपदाचा करंडक स्वीकारण्यास का दिला नकार?