-
देशांतर्गत क्रिकेटमध्ये मेघालय संघाकडून खेळणारा आकाश कुमार चौधरी सध्या तुफान चर्चेत आहे. या खेळाडूने रणजी ट्रॉफी स्पर्धेत अरूणाचल प्रदेश संघाविरूद्ध फलंदाजी करताना अवघ्या ११ चेंडूत अर्धशतक झळकावलं. (फोटो- इंस्टाग्राम)
-
यादरम्यान त्याने विरोधी संघातील गोलंदाजांची धुलाई करताना लागोपाठ ८ षटकार मारले. यासह त्याच्या नावे मोठ्या विक्रमाची नोंद झाली आहे.(फोटो- एक्स)
-
आकाश कुमार चौधरी हा प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये लागोपाठ ८ षटकार मारणारा पहिलाच फलंदाज ठरला आहे. तर लागोपाठ ६ षटकार मारणारा तिसरा फलंदाज ठरला आहे. दरम्यान कोण आहेत सुरूवातीचे २ फलंदाज? जाणून घ्या. (फोटो- एक्स)
-
या यादीत सर गॅरी सोबर्स हे अव्वल स्थानी आहेत. गॅरी सोबर्स यांनी १९६८ मध्ये नॉटिंगहॅमशायर संघाकडून खेळताना ग्लेमॉर्गन संघाविरूद्ध खेळताना लागोपाठ ६ चेंडूंवर ६ षटकार मारले होते. (फोटो- एक्स)
-
तर भारताचे माजी कर्णधार रवी शास्त्री या यादीत दुसऱ्या स्थानी आहेत. रवी शास्त्री यांनी १९८५ मध्ये मुंबईकडून खेळताना लागोपाठ ६ षटकार खेचले होते.(फोटो- एक्स)
-
आता या यादीत आकाश कुमार चौधरीच्या देखील नावाचा समावेश झाला आहे. त्याने अरूणाचल प्रदेश संघाकडून खेळताना हा पराक्रम केला आहे. (फोटो- एक्स)
स