-
टी २० विश्वचषक स्पर्धेत भारत आणि न्यूझीलंड यांच्यात खेळला जाणारा सामना खूप महत्वाचा ठरणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी होणाऱ्या या सामन्यात कोणताही संघ हरला तरी स्पर्धेतील त्याचा प्रवास जवळपास संपुष्टात येणार आहे. कारण दोन्ही संघांना पहिल्याच सामन्यात पराभवाला सामोरे जावे लागले आहे.
-
भारताचा अष्टपैलू हार्दिक पंडय़ाने बऱ्याच महिन्यांच्या कालावधीनंतर बुधवारी सराव सत्रामध्ये गोलंदाजीचा सराव केला. त्यामुळे ट्वेन्टी-२० विश्वचषकात रविवारी होणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात गोलंदाजीसह त्याने सहाव्या क्रमांकावर आपली दावेदारी मजबूत केली आहे.
-
बीसीसीआयने आपल्या सोशल मीडियावर हार्दिकचे तीन फोटो अपलोड केले. यापैकी तो पहिल्या फोटोत फलंदाजी करत आहे.
-
दुसऱ्या फोटोत हार्दिक गोलंदाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहे. मागील रविवारी पाकिस्तानने भारताचा १० गडी राखून धुव्वा उडवला होता. या सामन्यात फलंदाजी करताना उजव्या खांद्याला चेंडू लागून हार्दिकला दुखापत झाली. त्यामुळे त्याच्या तंदुरुस्तीबाबत साशंकता होती. मात्र, बुधवारी त्याने भारतीय संघाचे फिजिओ नितीन पटेल यांच्या देखरेखीखाली सराव केला.
-
बीसीसीआयने हा हार्दिकचा तिसरा फोटो शेअर केला आहे. या तीन फोटोंना बीसीसीआयने ‘LOADING’ असे कॅप्शन दिले आहे. बीसीसीआयने या फोटोंद्वारे न्यूझीलंडला सावधानतेचा इशारा दिला आहे. टी-२० विश्वचषकाच्या इतिहासात भारतीय संघाला आजपर्यंत न्यूझीलंडविरुद्ध विजय मिळवता आलेला नाही. पण हा इतिहास टीम इंडिया बदलते का हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

बाबा वेंगा यांच्या भविष्यवाणीनुसार लवकरच ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ? डिसेंबर २०२५ पर्यंत होऊ शकतात गडगंज श्रीमंत