-
सध्याच्या काळामध्ये इंटरनेट खूप महत्वाची गोष्ट झाली आहे. इंटरनेट हे करमणुकीचे साधन आहेच पण त्याबरोबर आता इंटरनेटचा वापर पैसे कमवण्यासाठीही केला जातो. सध्या बरेचसे व्यवसाय इंटरनेटच्या भरवशावर चालत आहेत. इंटरनेट हे पैसे कमावण्याचे एक उत्तम साधन बनले आहे.
-
१) ई-बुक लिहिणे : इंटरनेटवरून पैसे कमावण्यासाठी ई-बुक हा एक चांगला पर्याय आहे. सध्या बरेचसे लेखक ई-बुकच्या माध्यमातून पैसे कमवत आहेत. तुमची लेखन शैली उत्तम असेल आणि बुकचे मार्केटिंग उत्तम प्रकारे झाल्यास तुम्ही यामध्ये नक्की यशस्वी व्हाल आणि चांगले पैसे कमवाल.
-
२) यु ट्युबर : सध्या लहानमुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना युट्युबने खूप वेड लावले आहे. सिनेमनाची गाणी, फनी व्हिडिओ, टिप्स असे अनेक प्रकारचे व्हिडिओ बघण्यासाठी युट्युबचा वापर केला जातो. तुम्ही स्वतःचं युट्युब चॅनेल बनवून म्हणजेच एक यु ट्युबर बनून खूप पैसे कमवू शकता. फक्त यासाठी तुमचं नेटवर्क खूप स्ट्राँग असणं खूप गरजेचं आहे.
-
३) ई-मेल मार्केटिंग : इंटरनेटवरील व्यायवसायाचा केंद्रबिंदू म्हणजे ई-मेल मार्केटिंग. व्यवसायात जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचायचे असेल तर त्यासाठी ई-मेल मार्केटिंगचा खूप फायदा होतो. यामध्ये काहीवेळा ग्राहक तुमच्या संकेतस्थळाला किंवा ब्लॉगला साइन इन करतात त्याचा तुम्हाला जास्त फायदा होतो.
-
४) ऑनलाईन ट्युटोरिअल : घरबसल्या काम करण्याचा उत्तम पर्याय म्हणजे ऑनलाईन ट्युटोरिअल. तुम्ही ज्या विषयात तज्ज्ञ आहात ते विषय तुम्ही इतरांना ऑनलाईन ट्युटोरिअलच्या माध्यमाने इतरांना शिकवून उत्तम पैसे कमवू शकता.
-
५) ब्लॉगिंग : तुमचे विचार इतरांपर्यंत पोहोचवायचे असतील आणि इतरांना पटवून द्यायचे असतील तर ब्लॉग हा एक उत्तम प्रकार आहे. तुमची लेखन शैली उत्तम असेल तर तुमचे ब्लॉग प्रसिद्ध होऊन अनेक जाहिरातदार तुमच्यापर्यंत पोहचू शकतात आणि या मार्फत तुम्ही उत्तम पैसे कमवू शकता.
-
६) अॅफिलिएट मार्केटिंग : ऑनलाईन पैसे कमावण्याचा उत्तम आणि सोपा प्रकार आहे. ह्या प्रोमोशनमध्ये एखाद्या वाचकाने किंवा ब्लॉग वाचकाने खरेदी केली तर त्याचे तुम्हाला पैसे मिळतात.
-
७) फ्रीलान्सिंग : फ्रीलान्सर म्हणून काम करणे हा इंटरनेट वरून पैसे कमावण्याचा आणखी एक उत्तम मार्ग आहे. एखाद्या प्रॉडक्टचा उत्तम प्रकारे रिव्ह्यू देण्यासाठी तुम्हाला कंपनीकडून पैसे मिळतात. तुम्ही उत्तम फोटो ग्राफर असाल तर तुम्हाला तुमच्या फोटोसाठी सुद्धा पैसे मिळू शकतात. तुम्ही फ्रीलान्सर ब्लॉगर किंवा लेखक म्हणून सुद्धा काम करू शकता.

Video : फ्लाइट कॅप्टन भाचीकडून विमानात खास उद्घोषणा! पद्मश्री अशोक सराफ यांचं केलं अभिनंदन; म्हणाली, “माझे काका…”