-
सन २०१९ मध्ये २०१८ च्या तुलनेत कमी स्मार्टफोन विकले गेल्याचं काऊण्टरपॉइण्ट मार्केट मॉनिटर या कंपनीच्या अहवालात समोर आलं आहे. २०१८ च्या तुलनेत २०१९ मध्ये जगभरातील स्मार्टफोनची विक्री एका टक्क्याने कमी झाली आहे. असं असलं तरी अनेक आघाडीच्या स्मार्टफोन कंपन्यांनी करोडोच्या संख्येने जगभरात स्मार्टफोन विकले आहेत. मात्र २०१९ मध्ये सर्वाधिक स्मार्टफोन विकणारी कंपनी कोणती तुम्हाला ठाऊक आहे का? चला तर मग जाणून घेऊयात सर्वाधिक स्मार्टफोन विकणाऱ्या जगातील दहा अव्वल कंपन्यांबद्दल…
-
टेक्नो – सर्वाधिक स्मार्टफोन विकणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये दहाव्या स्थानी आहे टेक्नो ही कंपनी. जागतिक स्मार्टफोन बाजारपेठेचा एक टक्का हिस्सा या कंपनीचा आहे. या कंपनीने २०१९ साली २.१५ कोटी फोन विकले आहेत.
-
रियलमी – नवव्या क्रमांकावर चीनमधील रियलमी कंपनी आहे. तुलनेने बाजारात नवीन असणाऱ्या या कंपनीने चांगली प्रगती केली असून काही वर्षांमध्येच जागतिक बाजारपेठेत २ टक्के हिस्सेदारी मिळवली आहे. २०१९ मध्ये रिअलमीने २.५७ कोटी फोन विकले.
-
एलजी- स्मार्टफोन बाजारपेठेच्या केवळ २ टक्के हिस्सेदारीसहीत एलजी यायादीमध्ये आठव्या स्थानी आहे. या दक्षिण कोरियन कंपनीने २०१९ मध्ये २.९२ कोटी स्मार्टफोन विकले आहेत.
-
लिनोव्हो ग्रुप – सर्वाधिक फोन विकणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये लिनोव्हो समूह सातव्या स्थानी आहे. स्मार्टफोन बाजारपेठेतील ३ टक्के हिस्सा असणारी मोटो कंपनीही लिनोव्होच्याच मालकीची आहे. मूळची चीनमधील असणाऱ्या या कंपनीने २०१९ मध्ये ३.९६ कोटी स्मार्टफोन विकले.
-
व्हिवो – चीनमधील बीबीके ग्रुपच्या मालकीची व्हिवो ही कंपनी सर्वाधिक स्मार्टफोन विकणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये सहाव्या स्थानी आहे. या कंपनीनचे जागतिक बाजारपेठेत आठ टक्के हिस्सा आहे. या कंपनीने २०१९ मध्ये ११.३७ कोटी फोन विकले.
-
ओपो – जागतिक स्तरावर ओपोची स्मार्टफोन बाजारपेठेतील हिस्सेदारी ८ टक्के इतकी आहे. ही कंपनी बीबीके ग्रुप या चीनी कंपनीच्या मालकीची आहे. ही जगातील सर्वाधिक स्मार्टफोन विकणारी पाचव्या क्रमांकाची कंपनी असून त्यांनी मागील वर्षी ११.९८ कोटी फोन विकले आहेत.
-
शाओमी – सर्वाधिक स्मार्टफोन विकणाऱ्या कंपन्यांच्या यादीत शाओमी चौथ्या स्थानी आहे. जागतिक स्मार्टफोन बाजाराच्या एकूण हिस्सेदारीपैकी ८ टक्के हिस्सा शाओमीचा आहे. कंपनीने मागील वर्षी १२.४५ कोटी स्मार्टफोन विकले आहेत.
-
आयफोन – जगभरात आपल्या आधुनिक तंत्रज्ञानासाठी ओळखल्या जाणऱ्या आयफोनचा शेअर १३ टक्के इतका आहे. अॅपलने २०१९ मध्ये ११.६२ कोटी फोन विकले आहेत.
-
हुवाई – चीनमधील ही कंपनी सर्वाधिक फोन विकणाऱ्या कंपन्यांच्या यादीमध्ये दुसऱ्या स्थानी आहे. स्मार्टफोन मार्केटमधील या कंपनीची हिस्सेदारी १६ टक्के इतकी आहे. २०१९ मध्ये कंपनीने जगभरात २३.८५ कोटी फोन विकले आहेत.
-
सॅमसंग – जगभरात विकल्या जणाऱ्या फोन्सपैकी २० टक्के फोन हे सॅमसंगचे असतात. २०१९ मध्ये या दक्षिण कोरियन कंपनीने २९.६१ कोटी फोन निर्यात केले.

“ज्याची भीती होती तेच घडलं”, ट्रम्प यांच्या टॅरिफ बॉम्बनंतर अमेझॉन, वॉलमार्टचा मोठा निर्णय; भारताची चिंता वाढली