-
भारतात वेगाने फोफावत असलेल्या डिजिटल उलाढालींसाठी वापरल्या जाणाऱ्या अव्वल पाचपैकी चार स्मार्टफोनच्या मुळाशी चिनी कंपन्या आहेत.
-
सरलेल्या जुलै-सप्टेंबर तिमाहीत झालेल्या डिजिटल व्यवहारांमध्ये तब्बल ४५ टक्के व्यवहार हे शाओमी आणि विवो या दोन फोनच्या वापरातून पार पडले आहेत.
-
वॉलमार्टचे पाठबळ असलेल्या ‘फोनपे’ या ‘युनिफाइड पेमेंट इंटरफेस – यूपीआय’ व्यवहारांसाठी सर्वाधिक वापरात येणाऱ्या मोबाइल उपयोजनाच्या (अॅप) तिमाही ‘पल्स’ अहवालाने हे निष्कर्ष नोंदविले आहेत.
-
फोनपेचे तब्बल ३.२८ कोटी नोंदणीकृत वापरकर्ते आहेत.
-
देशभरातील ७२६ जिल्ह्यांपैकी ७२० जिल्ह्यांमधील ग्राहकांकडून होणाऱ्या जवळपास ४५ टक्के यूपीआय व्यवहारांची प्रक्रिया फोनपे अॅपद्वारे केली जाते.
-
शाओमीचा फोन वापरणारे ८ कोटी ग्राहक हे फोनपे अॅपचा वापर करत आहेत.
-
तर विवो फोनधारकांमध्ये हे प्रमाण ६.५ कोटी इतके असल्याचं समोर आलं आहे.
-
त्या खालोखाल दक्षिण कोरियाच्या सॅमसंग फोनच्या वापरकर्ते येतात आणि त्यांची संख्या ६.१० कोटी इतकी आहे, असे फोनपे अॅपद्वारे प्रसिद्ध माहिती सांगते.
-
चौथ्या व पाचव्या क्रमांकावरील ओप्पो आणि रिअलमी फोनच्या वापरकर्त्यांचे प्रमाण अनुक्रमे ४.२ कोटी आणि २.४ कोटी असे आहे.
-
या अव्वल पाचांपैकी सॅमसंग वगळल्यास अन्य सर्व फोनच्या नाममुद्रांचे मूळ चिनी आहे.
-
‘फोनपे पल्स’ अहवालानुसार, जुलै-सप्टेंबर २०२१ तिमाहीत भारतातील डिजिटल देयक व्यवहारांत लक्षणीय वाढ दिसून आली.
-
या तिमाहीत प्रक्रिया झालेल्या डिजिटल व्यवहारातील देयकांचे एकूण मूल्य आधीच्या तिमाहीच्या तुलनेत २३.३ टक्क्यांनी वाढून ९,२१,६७४ कोटी रुपयांवर गेले.
-
एकूण उलाढालींचे प्रमाणही तिमाहीगणिक ३३.६ टक्क्यांनी वाढून ५२६.५ कोटी उलाढालींपर्यंत वाढले आहे.
-
दुसरी लाट ओसरल्यानंतर, जास्त वेळेसाठी खुली झालेली दुकाने पाहता ऑनलाइन यूपीआय देयक व्यवहारांच्या तुलनेत जुलै-सप्टेंबर तिमाहीत ऑफलाइन यूपीआय देयक व्यवहारांचे प्रमाण ६५ टक्क्यांनी वाढल्याचे अहवाल सांगतो.
-
या अहवालावरुन वधारत्या डिजिटल देयक व्यवहारांचे भारवाही चिनी स्मार्टफोनच असल्याचं दिसून येत आहे.

“अरे जरा तरी लाज ठेवा” दादरच्या शिवाजी पार्कवर भर दिवसा किळसवाणं कृत्य; VIDEO पाहून तुम्हालाही येईल प्रचंड राग