-
ह्युंदाई मोटर्स कॉर्पोरेशनने आपल्या नवीन सेडान कारचे अनावरण केले आहे, जी एक प्रीमियम इलेक्ट्रिक कार आहे. लूक आणि फीचर्समुळे ही कार टेस्ला आणि जनरल मोटर्स कॉर्पोरेशनला टक्कर देईल. ह्युंदाईची ही कार एका चार्जमध्ये ६१० किमी अंतर कापण्यास सक्षम असेल. चला जाणून घेऊया या कारचे फीचर्स आणि किंमत.
-
Hyundai Ionic 6 मध्ये ७७.४ kWh बॅटरी आहे, जी ६१० किमीची रेंज देते. तर Ionic 5 फक्त ४२९ किमी ड्रायव्हिंग देते. कंपनीने ही कार दक्षिण कोरियात होणाऱ्या बुसान इंटरनॅशनल मोटर दरम्यान सादर केली आहे. त्याचे उत्पादन या वर्षाच्या तिसऱ्या तिमाहीपासून सुरू होईल आणि यासाठीची बॅटरी एलजी एनर्जी सोल्युशन्स लिस्टेडद्वारे पुरवली जाईल.
-
दक्षिण कोरियामध्ये या कारची विक्री सप्टेंबरमध्ये सुरू होऊ शकते. त्याची सुरुवातीची किंमत ५.५ लाख वॉन (सुमारे ३३,५२,४४८ रुपये) असू शकते. मात्र, ती भारतात कधीपर्यंत दाखल होईल याची माहिती देण्यात आली आहे.
-
Ionic 6 मध्ये जुन्या वर्जनप्रमाणे ऑटोनॉमस ड्रायव्हिंग फीचर्स देण्यात आले आहेत. यात हायवे ड्रायव्हिंग असिस्टंट २ आणि ब्लाइंड स्टॉप अवॉयडन्स असिस्टन्सची फीचर्स देखील आहेत. या कारमधील सीट या सेगमेंटमधील इतर कारच्या तुलनेत ३० टक्के पातळ आहेत.
-
यामध्ये युजर्सच्या गरजा लक्षात घेऊन वायरलेस चार्जिंग आणि मजबूत इंटीरियर पाहायला मिळणार आहे. कंपनीला आशा आहे की, या कारची विक्री एक नवीन पातळी गाठेल.
-
गेल्या दोन ते तीन वर्षांत, ईव्ही कारचा सेगमेंट जगभरात वेगाने विस्तारला आहे.

“एक झेरॉक्स दे ना”, असं म्हणणाऱ्यांनो ‘झेरॉक्स’ला मराठीत काय म्हणतात माहितीये का? उत्तर जाणून घ्या…