-
ॲपल (Apple) कंपनीनं आपला महत्त्वाकांक्षी आयफोन १४ बाजारात आणण्याची तयारी पूर्ण केली असून पुढच्या महिन्यात हा मोबाईल लॉन्च होण्याची शक्यता आहे. आयफोन १४ बाजारात येत असल्यामुळे आता आयफोन १३ च्या कमी होऊ लागल्या आहेत. फ्लिपकार्टनं आयफोन १३ वर आकर्षक ऑफर सुरू केली आहे.
-
ई-क़ॉमर्स साईट फ्लिपकार्टवर आयफोन १३ ची किंमत ६५,९९९ रुपये करण्यात आली आहे. त्याशिवाय हँडसेटवर एक्सचेंज ऑफरदेखील दिली जाणार आहे. आयफोन १३ वर १३,९०१ रुपयांची सूट देण्यात आली आहे. तुमच्याकडे HDFC बँकेचे क्रेडिट कार्ड असल्यास तुम्ही डीलवर अतिरिक्त १,००० रुपये वाचवू शकता.
-
ग्राहकांना जुन्या हँडसेटवर जास्तीत जास्त १९ हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट दिला जात आहे. सगळी सूट धरून आयफोन १३ ची किंमत सुमारे ६२,९९९ रुपये असेल. आयफोन १३ च्या बेस मॉडेलमध्ये १२८जीबी मेमरी देण्यात आली आहे. या सीरिजमध्ये आय़फोन १३, आयफोन १३ मिनी, आय़फोन १३ प्रो, आणि आयफोन ११ चा समावेश आहे.
-
आयफोन १३ मिनीच्या १२८ जीबी मॉडेलवर ७% सूट देण्यात आली आहे. सध्या आयफोन मिनीची किंमत ६४,९९९ रुपये आहे
-
ऑफरमुळे या मोबाईलची किंमत जवळजवळ १९ हजार रुपयांनी कमी करण्यात आली आहे.
-
एवढचं नाही तर अनेक बॅंक या मोबाईलवर मोठ्या प्रमाणात सूटही देत आहेत.
-
आयफोन १२ च्या ६४ जीबी मॉडेलवर फ्लिपकार्डवर मोठी सूट देण्यात आली आहे. सध्या फिल्पकार्डवर या फोनची किंमत ५३,९९९ रुपये आहे.
-
फिल्पकार्डवर या फोनवर १८ टक्के सूट देण्यात येत आहे. एवढचं नाही तर फिल्पकार्डवर क्लब कार्ड सवलतही उपलब्ध आहे. एसबीआय, मास्टरकार्ड आणि डेबिट कार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना १० टक्के सूट मिळू शकते.
-
तसेच फिल्पकार्डवर अॅक्सेस बॅंकेच्या कार्ड धारकांना मोबाईलवर ५ टक्के सूट देण्यात आली आहे.
-
सध्या फिल्पकार्डवर आयफोन १२ प्रो ची किंमत १ लाख ९ हजार १५० रुपये आहे. एक्सचेंज ऑफरमध्ये या किंमतीवर १७ हजार रुपयांपर्यंत सूट मिळू शकते.
-
एसबीआय मास्टरकार्ड, डेबिटकार्ड धारकांना मोबाईलच्या किंमतीवर १० टक्के सूट देण्यात आली आहे.
-
तसेच फिल्पकार्डने अॅक्सिस बॅंक धारकांना मोबाईलच्या किंमतीवर ५ टक्के सूट दिली आहे.
-
अॅपलने गेल्या वर्षी आयफोन ११ ची अधिकृत किंमत ४९,९०० रुपयांनी कमी केली आहे. आयफोन ११ अजूनही लोकप्रिय असल्यामुळे कंपनीने हा फोन अद्याप बंद केलेला नाही.
-
आता कंपनीने आयफोन ११ ची किंमत आणखी ९ हजार ९०१ रुपयांनी कमी केली आहे. त्यामुळे या मोबाईलची किंमत आता ३९,९९९ रुपये झाली आहे.
-
एचडीएफसी बँक आणि अॅक्सिस बँक कार्ड धारकांना फिल्पकार्डकडून आणखी सवलत देण्यात आली आहे.
नसांत साचलेलं खराब कोलेस्ट्रॉल एका दिवसात बाहेर पडेल; फक्त स्वयंपाकघरात असणारा ‘हा’ एक पदार्थ खा, रक्त होईल साफ