-
उत्तर पूर्व अमेरिकेतील पेनसिल्व्हेनिया येथील दुग्धालय व्यवसायामधील क्रांती आणि त्या ठिकाणच्या १०२ व्या फार्म शोच्या निमित्ताने तब्बल ४५३ किलोंच्या बटरपासून एक शिल्प साकारण्यात आले आहे. (छाया सौजन्य- AP)
अमेरिकन डेअरी असोसिएशन नॉर्थ इस्ट (एडीएएनई)च्या आर्थिक मदतीने हे शिल्प साकारण्यात आले. 'विविधतेतच आमची ताकद आहे', अशा घोषवाक्यासह हे शिल्प प्रदर्शनासाठी ठेवण्यात आले. (छाया सौजन्य- Priscilla Liguori) दुग्धालयांसाठी उपयोगी असणाऱ्या गाई, तेथे काम करणारे लोक, गाईच्या दुधावर होणाऱ्या प्रक्रिया आणि शेवटी ग्राहकापर्यंत पोहोचणारे उत्पादन या सर्व गोष्टी या एकाच शिल्पातून साकारण्यात आल्या आहेत. (छाया सौजन्य- Sue Gleiter) डेअरी उत्पादनांच्या क्षेत्रात असणाऱ्या करिअरच्या संधी आणि त्यांची महत्त्वाची भूमिका हे महत्त्वाचे मुद्देही या शिल्पातून इतरांपर्यंत पोहोचवण्यात आले आहेत, असे कृषी सचिव रसेल रेडिंग म्हणाले. (छाया सौजन्य- PA Farm Show/ Twitter) हे शिल्प साकारण्यासाठी वापरण्यात आलेले बटर हे मुळ प्रक्रियेतून निर्माण झालेले टाकाऊ बटर आहे. (छाया सौजन्य- PA Farm Show/ Twitter) (छाया सौजन्य- PA Farm Show/ Twitter)

Nimisha Priya : भारतीय नर्स निमिषा प्रियाला १६ जुलै रोजी येमेनमध्ये होणार फाशी, जाणून घ्या नेमकं हे सगळं प्रकरण काय?