नवरात्रीच्या निमित्ताने महाराष्ट्रात भोंडला खेळला जातो.आश्विन शुद्ध प्रतिपदेला घटस्थापना होते आणि पुढचे नऊ दिवस देवीचा उत्सव साजरा केला जातो. या दिवसांत मुली-महिला संध्याकाळी दिवेलागणीनंतर नटून-थटून, नऊवारी साडी, परकर-पोलके अशा पारंपरिक वेशात एकत्र येतात. (छाया- दीपक जोशी) भोंडला खेळात मधोमध हत्तीची सजवलेली मूर्ती ठेवली जाते किंवा रांगोळीने हत्तीचे चित्र काढले जाते. काही ठिकाणी मूगडाळ आणि तांदळांच्या साहाय्याने हत्तीची प्रतिकृती काढली जाते. (छाया- दीपक जोशी) -
त्यानंतर लहान मुली हत्तीभोवती गोल फेर धरून नाचतात. (छाया- दीपक जोशी)
-
पूर्वी मुलींचे लग्न अगदी लहान वयात व्हायचे. कुटुंब, संसार आणि घरकामांच्या जबाबदारीतून मुलींना थोडी उसंत मिळावी यासाठी भोंडल्यासारखे खेळ खेळले जातं.(छाया- दीपक जोशी)
-
खान्देशात हत्तीऐवजी भुलोजी आणि भुलाबाई या नावाने शंकर-पार्वतीची मूर्ती ठेवण्याचीही प्रथा आहे. तिथे या खेळाला भुलाबाई म्हणतात तर विदर्भात हादगा म्हणतात.(छाया- दीपक जोशी)
-
(छाया- दीपक जोशी)

‘एचएसआरपी’ नंबर पाटीबाबत मोठी बातमी… राज्यात ३० टक्केच वाहनांना पाट्या लागल्या… १५ ऑगस्टनंतर…