-
वंचित बहुजन आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.
-
चार वाजता प्रकाश आंबेडकर यांनी हा बंद मागे घेत असल्याची घोषणा केली.
आंदोलनादरम्यान काही ठिकाणी हिंसाचार झाल्याचं पहायला मिळालं. तर काही ठिकाणी कडकडीत बंद पाळण्यात आला. सीएए, एनआरसी आणि खासगीकरण यांचा विरोध करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीने महाराष्ट्र बंदची हाक दिली होती. -
-
ठाण्यात तीन हात नाका चौकात 'वंचित'च्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवला होता
-
महाराष्ट्र बंद असल्याने पोलिसांचा चोख बंदोबस्त जागोजागी तैनात करण्यात आला होता
-
पोलिसांचा फौजफाटा
-
सायनला आंदोलकांना रास्ता रोको केला
-
गोवंडीतील आंदोलन
गोवंडीत आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं. मुंबईत चेंबूरमध्ये बसवर दगडफेक करण्यात आली. महाराष्ट्र बंद दरम्यान औरंगाबादमध्ये सिटी बसवर दगडफेक करण्यात आली. घाटकोपरमधील रमाबाई नगर येथे पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर) घाटकोपरमधील रमाबाई नगर वंचितच्या कार्यकर्त्यांचं आंदोलन (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर) (एक्स्प्रेस फोटो – प्रशांत नाडकर) -
नाशिकमध्ये शांततेत आंदोलन करण्यात आलं
-
सोलापूरमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आल्याचं चित्र होतं
-
सोलापूर
ठाण्यातील घोडबंदर येथे वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी रस्ता अडवण्याचा प्रयत्न केला. (एक्स्प्रेस फोटो – दीपक जोशी) -
परभणीत कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला होता
-
जळगावमध्ये पोलीस आणि आंदोलकांमध्ये बाचाबाची झाली
अकोल्यात भाजप आमदार आणि वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची औरंगाबादमध्ये हर्सूल टी पॉईंट भागातील पेट्रोल पंप 'वंचित'च्या कार्यकर्त्यांकडून बंद प्रकाश आंबेडकर यांचे चिरंजीव सुजात आंबेडकर आंदोलनात सहभागी झाले होते पुण्यात दांडेकर पुलावर रास्ता रोको करण्यात आला -
पुण्यातील पोलिसांचा बंदोबस्त
-
माढामध्ये कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला
-
उस्मानाबादमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला
-
उस्मानाबाद
-
बारामतीमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला.
-
सांगलीत अनेक ठिकाणी शांतता पाहण्यास मिळाली
-
नांदेडमध्ये बंदला चांगला प्रतिसाद मिळाला
-
नांदेड
-
नांदेड
-
अकोल्यातील आंदोलन

“पुढील १० वर्षांत फक्त ‘याच’ नोकऱ्या टिकतील”; निखिल कामथ म्हणाले, “शिक्षण…”