-
Maruti Suzuki ने सोमवारी (दि.२४) आपली बहुप्रतिक्षित एसयुव्ही Vitara Brezza Facelift लाँच केली. यासोबतच या लोकप्रिय एसयुव्हीच्या किंमतीचाही खुलासा झाला.
Brezza च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये झालेला सर्वात मोठा बदल म्हणजे यातील इंजिन. नवीन Brezza बीएस-6 कम्प्लायंट 1.5-लिटर पेट्रोल इंजिनमध्ये उपलब्ध असेल, आतापर्यंत ही कार 1.3-लिटर डिझेल इंजिनमध्येही यायची. -
अवघ्या 11 हजार रुपयांमध्ये देशभरातील कोणत्याही मारुतीच्या डिलरशिपमध्ये या कारसाठी बुकिंगला सुरूवात झाली आहे.
-
नव्या Brezza मध्ये 1.5-लिटर K15B पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 103 bhp ची ऊर्जा आणि 138 Nm टॉर्क निर्माण करते. यासोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि 4-स्पीड ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय आहे.
-
ऑटोमॅटिक गिअरबॉक्स व्हेरिअंटमध्ये मारुतीची स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीही देण्यात आली आहे.
मॅन्युअल गिअरबॉक्समध्ये Brezza चा मायलेज 17.03 किलोमीटर, तर स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीसह येणाऱ्या ऑटोमॅटिक ट्रांसमिशन व्हेरिअंटचा मायलेज 18.76 किलोमीटर प्रतिलीटर असेल. -
Brezza च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये तुम्हाला नवीन ट्विन-स्लेट ग्रिल, रिवाइज्ड बंपर, नव्या डिझाइनचे एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, L-शेप डीआरएल, 16-इंच ड्युअल टोन अॅलॉय व्हिल्स, नवीन फॉग लॅम्प हाउसिंग आणि बुल-बार स्टाइल स्किड प्लेट मिळतील.
-
गाडीच्या मागील बाजूला एलईडी टेललँम्प देण्यात आले आहेत. याशिवाय गाडीच्या डिझाइनमध्ये बदल करण्यात आलेला नाही.
-
नव्या Brezza च्या कॅबिनमध्ये नवीन 7-इंच स्मार्टप्ले स्टूडियो इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. ही इन्फोटेन्मेंट सिस्टिम आता लाइव्ह ट्रॅफिक अपडेट, व्हॉइस रिकग्निशन, व्हेइकल अलर्ट आणि क्युरेटेड ऑनलाइन कॉन्टेंटसोबत येते.
-
याशिवाय इन्फोटेन्मेंट सिस्टिम पहिल्याप्रमाणे अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्ले सपोर्ट करेल.
-
मार्केटमध्ये नव्या Brezza ची स्पर्धा टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू, महिंद्रा एक्सयूवी300 आणि फोर्ड इकोस्पोर्ट यांसारख्या एसयुव्हींसोबत असेल.
-
फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये डिझेल इंजिन मिळणार नाही. कारण, भारतात एप्रिल 2020 पासून बीएस-6 मानक लागू झाल्यानंतर डिझेल इंजिनच्या कार बंद करण्याची घोषणा यापूर्वीच मारुतीने केली होती.
फेब्रुवारी महिन्यात ऑटो एक्स्पोमध्ये ही एसयुव्ही सादर करण्यात आली होती. -
Vitara Brezza च्या विविध व्हेरिअंटची एक्स-शोरुम किंमत 7.34 लाख ते 11.40 लाख रुपयांदरम्यान ठेवण्यात आली आहे.
कोणत्या व्हेरिअंटची किंमत किती – LXi : 7.34 लाख रुपये VXi : 8.35 लाख रुपये ZXi : 9.10 लाख रुपये ZXi+: 9.75 लाख रुपये ZXi+ (Dual-tone): 9.98 लाख रुपये VXi AT (Smart hybrid) : 9.75 लाख रुपये ZXi AT (Smart Hybrid) : 10.50 लाख रुपये ZXi+ AT (Smart Hybrid) : 11.15 लाख रुपये ZXi+ AT (Smart Hybrid + Dual Tone) : 11.40 लाख रुपये

चिमुकल्याने महाकाय सापाला पटापट चापट मारल्या, फणा धरून तोंडाजवळ नेलं अन्…; धडकी भरवणारा VIDEO VIRAL