-
अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्याबरोबरीने त्यांची कन्या इव्हांका ट्रम्पचीही भारत दौऱ्यामध्ये चर्चा आहे. इव्हांका ट्रम्प यांचा पोषाख आणि लूक नेहमीच चर्चेत असतो. (फोटो सौजन्य – इव्हांका ट्रम्प इन्स्टाग्राम)
-
इव्हांका ट्रम्प यांचा हैदराबाद हाऊसमधील फोटो. त्यांनी आज अनिता डोंगरे यांनी डिझाईन केलेला सफेद रंगाचा शेरवानी परिधान केला आह.
-
हाताने विणलेल्या मुर्शिदाबाद सिल्कपासून बनवलेला शेरवानी इव्हांका ट्रम्पने परिधान केला आहे. वीस वर्षांपूर्वीची ही स्टाइल आजही काळाशी सुंसगत असल्याचा आंनद वाटतो असे अनिता डोंगरे म्हणाल्या.
-
इव्हांका ट्रम्प यांचा अहमदाबादच्या साबरमती आश्रमातील पती जेराड कुशनर यांच्यासोबतचा फोटो. भारताला स्वातंत्र्य मिळवून दिलेल्या विचारधारेचे हे घर आहे. इथे प्रेरणा मिळते असे इव्हांका यांनी इन्स्टाग्रामवरील फोटो कॅप्शन दिले आहे.
-
जगातल्या सात आश्चर्यांपैकी एक असलेल्या ताजमहल इथे इव्हांका ट्रम्प यांचा काढलेला सुंदर फोटो.
-
पती जेराड कुशनरसोबतचा इव्हांका ट्रम्प यांचा ताजमहल इथला फोटो.
-
मोटेरा स्टेडिअमवरील नमस्ते ट्रम्प कार्यक्रमातील इव्हांका ट्रम्प यांचा फोटो.
-
इव्हांका सामाजिक जीवनात मोठया प्रमाणावर सक्रीय आहेत. वडिलांच्या राजकीय सल्लागार म्हणूनही इव्हांका ट्रम्प यांच्याकडे पाहिले जाते.
-
इव्हांका ट्रम्प यांच्या जादुई व्यक्तीमत्वामुळे माध्यमांनाही त्यांचे मोठया प्रमाणावर आकर्षण आहे.
-
दोन वर्षांपूर्वी एका कार्यक्रमासाठी इव्हांका ट्रम्प भारतात हैदराबादमध्ये आल्या होत्या. त्यानंतर आता दोन वर्षांनी भारतात आल्या आहेत. त्यानिमित्त त्यांनी पंतप्रधान मोदींसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

प्रत्येकाचा हिशोब उघडणार! साडेसाती असलेल्या ‘या’ लोकांची शनी महाराज नोव्हेंबरपासून खरी परीक्षा घेणार? कुणाच्या नशिबातील सुख हरपणार?