-
'मिस ग्रेट ब्रिटन २०२०-२१'चा किताब जिंकणारी जेन एटकिनचा हा प्रेरणादायी प्रवास आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
तीन वर्षांपूर्वी खूपच जाड असल्याचे सांगत जेनच्या होणाऱ्या नवऱ्याने तिच्याशी नातं तोडलं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
ब्रेकअपनंतर जेन खूपच दुःखी झाली. त्यानंतर तिनं स्वतःशीच ठरवलं की वजन कमी करायचं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
अनेक वर्षे जीममध्ये घालवल्यानंतर जेननं आश्चर्यकारकरित्या आपलं वजन तब्बल ५० किलोंनी घटवलं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
वजन घटवल्यानंतर जेन एटकिननं मिस ग्रेट ब्रिटनच्या स्पर्धेत भाग घ्यायचं ठरवलं. यासाठी तिनं कठोर मेहनत केली आणि तिनं अखेर या किताबावर आपलं नाव कोरलं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
होणाऱ्या नवऱ्याशी ब्रेकअपनंतर जेननं हेल्दी डायटसह जीममध्ये जायला सुरुवात केली. त्यानंतर दोन वर्षांनंतर तिनं ब्युटी पेजेंट्समध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
यामध्ये सर्वप्रथम तिनं मिस स्कन्थोरपे हा किताब जिंकला. त्यानंतर तिनं 'मिस इंग्लंड २०१८' मध्ये भाग घेतला. या स्पर्धेत ती फर्स्ट रनरअप राहिली. यानंतर तिनं काही काळासाठी ब्यूटी पेजेंटमधून ब्रेक घ्यायचं ठरवलं. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
त्यानंतर तिनं ७५व्या 'मिस ग्रेट ब्रिटन'मध्ये सहभाग घेतला आणि हा किताब जिंकला. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
गेल्या आठवड्यात इंग्लंडच्या लस्टरमध्ये या स्पर्धेच्या अंतिम सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
आपण ब्रेकअपपूर्वी कसे होतो हे सांगताना जेन म्हणते, "पूर्वी मी अधिक प्रमाणात पास्ता आणि पिझ्झा खात होते. तसंच मी एकटीच फॅमिली पॅकचं आईस्क्रिमही फस्त करीत होते." (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
जेन म्हणते, "जेव्हा माझ्या होणाऱ्या नवऱ्याने माझ्यासोबतचं नात तोडलं तेव्हा मला वाटलं आता माझं जगचं संपलं. मी अनेक आठवडे रडत होते. मात्र, त्यावेळी माझ्यासोबत जे झालं ते चांगलंच झालं. कारण त्यानंतर मी जीवनाकडे गांभीर्याने बघायला शिकले आणि त्यानंतर स्वतःवर काम करायला सुरुवात केली." (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
विकेंडला आम्ही कायमच सोफ्यावर बसून एकमेकांसोबत जेवण करीत असू माझी विशेष अशी हालचाल होत नसे, हे देखील तिनं सांगितलं आहे. (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
जेन म्हणते, "या स्पर्धेच्या परिक्षकांनी माझ्या व्यक्तीमत्वाच्या आधारेच माझी या किताबासाठी निवड केली असावी." (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
जेन म्हणते, "'मिस ग्रेट ब्रिटन' स्पर्धा जिंकल्यानंतर माझा मोठा आणि कठीण संघर्षाचा काळ संपला आहे. माझं शरीर जरुर बदललं मात्र माझं व्यक्तीमत्व आजही तेच आहे." (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)
-
जेननं म्हटलं की, "हा किताब जिंकल्याने मलाच आश्चर्याचा धक्का बसला आहे. माझ्याजवळ आनंद व्यक्त करायला शब्दच नाहीत. कारण तीन वर्षांपूर्वी मी मिस ग्रेट ब्रिटनचा किताब जिंकू शकेन असा विचारही केला नव्हता." (फोटो सौजन्य – इन्स्टाग्राम)

१८ वर्षांनंतर अखेर ‘या’ राशींच्या नशीबी येणार अफाट पैसा; सूर्य आणि मंगळाच्या युतीनं ‘या’ राशींचा सुरु होणार सुवर्णकाळ