-
हीरो मोटोकॉर्पने आपली भारतातील सर्वाधिक पॉप्युलर बाइक Hero Super Splendor बीएस-6 इंजिनसह लाँच केली आहे. यासोबतच बाइकच्या किंमतीतही बदल झालाय. (सर्वछ छायाचित्र सौजन्य -heromotocorp.com )
-
ही बाइक सेल्फ ड्रम अॅलॉय व्हिल आणि सेल्फ डिस्क अॅलॉय व्हिल अशा दोन व्हेरिअंट्समध्ये उपलब्ध असेल.
-
नवीन सुपर स्प्लेंडरमध्ये XSens टेक्नॉलॉजी असलेले 125cc PFI (प्रोग्राम्ड फ्युअल इंजेक्शन) इंजिन आहे.
-
हीरो i3S टेक्नॉलॉजी असलेले या बाइकचे इंजिन आवश्यकता नसताना आपोआप स्विच ऑफ होते आणि केवळ क्लच प्रेस केल्यानंतर इंजिन पुन्हा सुरू होते.
-
नव्या सुपर स्प्लेंडरमधील बीएस-६ इंजिन आता 10.73bhp पावर आणि 10.6Nm टॉर्क निर्माण करते. हीरोच्या या बाइकमध्ये 5 स्पीड गिअरबॉक्स दिले आहेत.
-
नव्या हीरो सुपर स्प्लेंडरमध्ये ग्राउंड क्लियअंस 30mm वाढवण्यात आला आहे.
-
याशिवाय, आरामदायी प्रवासासाठी आधीपेक्षा 45mm जास्त लांब सीट देण्यात आलं आहे.
-
बाइकमध्ये 240mm फ्रंट डिस्क ब्रेक आहेत. तसेच, 130mm रिअर ड्रम ब्रेक CBS (कंबाइंड ब्रेकिंग सिस्टिम) आहे.
-
बाइकला आधीपेक्षा जास्त रिफ्रेशिंग लूक देण्यात आला असून ड्युइल पेंट स्कीमचा वापर करण्यात आला आहे.
-
ही बाइक नवीन मेटेलिक नेक्सस ब्लू शेडमध्ये उपलब्ध असेल. याशिवाय कँडी ब्लेजिंग रेड, ग्लेज ब्लॅक आणि हेवी ग्रे कलर अशा तीन अन्य रंगांचे पर्यायही आहेत.
कंपनीने काही दिवसांपूर्वीच आपल्या Xtreme 160R, Passion Pro आणि Glamour या तीन बाइक BS6 इंजिनमध्ये लाँच केल्या आहेत. -
कंपनीने आता आपल्या सर्व BS4 मॉडेल्सचं प्रोडक्शन बंद केलंय.
-
-
किंमत – सेल्फ ड्रम अॅलॉय व्हिल व्हेरिअंटची किंमत 67 हजार 300 रुपये आणि सेल्फ डिस्क अॅलॉय व्हिल व्हेरिअंटची किंमत 70 हजार 800 रुपये ठेवण्यात आली असून या दोन्ही एक्स-शोरुम किंमती आहेत.
-
नव्या बाइकची खासियत म्हणजे, हीरो i3S टेक्नॉलॉजी असलेले या बाइकचे इंजिन आवश्यकता नसताना आपोआप स्विच ऑफ होते आणि केवळ क्लच प्रेस केल्यानंतर इंजिन पुन्हा सुरू होते.

Ahmedabad Plane Crash: विमान दुर्घटनास्थळी ‘त्यांनी’ गोळा केलं ७० तोळे सोनं, साडी व बेडशीट वापरून जखमींना हलवलं; प्रत्यक्षदर्शींनी काय सांगितलं?