-
गेल्या महिन्यात झालेल्या ‘ऑटो एक्स्पो 2020’मध्ये मारुती सुझुकीने BS-6 इंजिनसह फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये लाँच केलेल्या एका कॉम्पॅक्ट SUV ची भारतीय बाजारात जबरदस्त मागणी असल्याची आकडेवारी समोर आली आहे.
-
परवडणाऱ्या किंमतीत दमदार फीचर्समुळे या एसयूव्हीच्या फेसलिफ्ट व्हर्जनची मार्केटमध्ये मागणी होती.
6 फेब्रुवारीला बुकिंगसाठी सुरूवात झालेल्या या कॉम्पॅक्ट SUV ला 26 फेब्रुवारीपर्यंत म्हणजे अवघ्या 20 दिवसांमध्येच या कारला ग्राहकांचा शानदार प्रतिसाद मिळालाय. -
'ऑटो एक्स्पो 2020’इव्हेंटमध्ये पहिल्यांदाच कंपनीने ही कॉम्पॅक्ट SUV कार BS6 पेट्रोल व्हर्जनमध्ये सादर केली. आतापर्यंत ही गाडी 1.3-लिटर डिझेल इंजिनमध्येही यायची. पण, फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये डिझेल इंजिन मिळणार नाही.
-
कारण, भारतात एप्रिल 2020 पासून बीएस-6 मानक लागू झाल्यानंतर डिझेल इंजिनच्या कार बंद करण्याची घोषणा यापूर्वीच मारुतीने केली आहे.
-
" नवीन Viatara Brezza ला ग्राहकांचा शानदार प्रतिसाद मिळतोय, आम्ही बुकिंग घ्यायला सुरूवात केल्यापासून अवघ्या 20 दिवसांमध्येच 10 हजाराहून अधिक Viatara Brezza गाड्यांची बुकिंग झाली आहे" अशी माहिती मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे कार्यकारी संचालक शशांक श्रीवास्तव यांनी दिली आहे. याचसोबत कमी किंमतीत लाँच झालेल्या मारुतीच्या नव्या इग्निसला मिळालेल्या प्रतिसादाबाबतही त्यांनी भाष्य केले.
-
Brezza च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये असलेले इंजिन आणि मारुतीच्या सियाजमधील इंजिन सारखेच आहे. हे 1.5-लिटर K15B पेट्रोल इंजिन 103 bhp ची ऊर्जा आणि 138 Nm टॉर्क निर्माण करते.
-
यासोबतच 5-स्पीड मॅन्युअल आणि ऑटोमॅटिक गिअरबॉक्सचा पर्याय मिळेल.
-
ऑटोमॅटिक गिअरबॉक्सच्या व्हेरिअंटमध्ये मारुतीच्या स्मार्ट हायब्रिड टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आला आहे. मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत या कारचा मायलेज 17.03 किलोमीटर, तर स्मार्ट हायब्रिडसोबत येणाऱ्या ऑटोमॅटिक ट्रांसमिशन व्हेरिअंटचा मायलेज 18.76 किलोमीटर प्रतिलीटर आहे.
-
नवीन लुक : Brezza च्या फेसलिफ्ट व्हर्जनमध्ये तुम्हाला नवीन ट्विन-स्लेट ग्रिल, नव्या डिझाइनचे एलईडी प्रोजेक्टर हेडलॅम्प, L-शेप डीआरएल, 16-इंच ड्युअल टोन अॅलॉय व्हिल्स, नवीन फॉग लॅम्प हाउसिंग आणि बुल-बार स्टाइल स्किड प्लेट आहे.
-
अपडेटेड फीचर : नव्या Brezza च्या कॅबिनमध्ये नवीन 7-इंच स्मार्टप्ले स्टूडियो इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. ही इन्फोटेन्मेंट सिस्टिम आता लाइव्ह ट्रॅफिक अपडेट, व्हॉइस रिकग्निशन, व्हेइकल अलर्ट आणि क्युरेटेड ऑनलाइन कॉन्टेंटसोबत येते. याशिवाय इन्फोटेन्मेंट सिस्टिम पहिल्याप्रमाणे अँड्रॉइड ऑटो आणि अॅपल कार-प्ले सपोर्ट करेल.
-
मार्केटमध्ये नव्या Brezza ची स्पर्धा टाटा नेक्सॉन, ह्युंदाई व्हेन्यू, महिंद्रा एक्सयूवी300 आणि फोर्ड इकोस्पोर्ट यांसारख्या एसयुव्हींसोबत असेल.
-
नव्या Brezza च्या मागील बाजूला एलईडी टेललॅम्प दिले आहेत, पण डिझाइनमध्ये काहीही बदल करण्यात आलेला नाही.
-
मॅन्युअल गिअरबॉक्ससोबत या कारचा मायलेज 17.03 किलोमीटर, तर स्मार्ट हायब्रिडसोबत येणाऱ्या ऑटोमॅटिक ट्रांसमिशन व्हेरिअंटचा मायलेज 18.76 किलोमीटर प्रतिलीटर आहे.
-
Brezza च्या पेट्रोल व्हर्जनची बेसिक किंमत 7.34 लाख रुपये आहे. तर, कारच्या टॉप मॉडेलची किंमत 11.40 लाख रुपये आहे. पुढे वाचा सर्व व्हेरिअंट्सची किंमत (एक्स-शोरुम) -Viatara Brezza LXi – 7.34 लाख रुपये, Viatara Brezza VXi – 8.35 लाख रुपये, Viatara Brezza VXi AT (Smart hybrid) –9.75 लाख रुपये, Viatara Brezza ZXi – 9.10 लाख रुपये, Viatara Brezza ZXi AT (Smart Hybrid) – 10.50 लाख रुपये, Viatara Brezza ZXi+ – 9.75 लाख रुपये, Viatara Brezza ZXi+ (Dual-tone) 9.98 लाख रुपये, Viatara Brezza ZXi+ AT (Smart Hybrid) – 11.15 लाख रुपये, Viatara Brezza ZXi+ AT (Smart Hybrid + Dual Tone) – 11.40 लाख रुपये.
-
पुढे बोलताना शशांक श्रीवास्तव यांनी मारुतीच्या नवीन Ignis फेसलिफ्ट व्हर्जनबाबतही माहिती दिली. नव्या इग्निसलाही ग्राहकांचा शानदार प्रतिसाद असून बुकिंग सुरू झाल्यानंतर थोड्याच दिवसांमध्ये दीड हजारांहून अधिक जणांनी बुकिंग केल्याचं त्यांनी सांगितलं.
कारमध्ये नवीन काय? : इग्निसच्या लुकमध्ये काही बदल करण्यात आले आहेत. कारला फ्रेश लुक देण्यासाठी कंपनीने कारच्या फ्रंटमध्ये नवीन क्रोम ग्रिल दिले आहेत, त्यामुळे कारला स्पोर्टी लुक आलंय. कारमध्ये फॉक्स स्कफ प्लेट्ससोबत नवीन फ्रंट आणि रिअर बंपर आहेत. याशिवाय वेगळे फॉग लॅम्प केसिंग आणि व्हर्टिकल रिफ्लेक्टरचा समावेश आहे. इंटेरियरमध्ये काय बदल ? : नव्या इग्निसमध्ये 7-इंच टचस्क्रीनसोबत मारुतीचा नवीन स्मार्टप्ले स्टुडियो इन्फोटेन्मेंट सिस्टिम आहे. याला अॅपल कारप्ले आणि अँड्रॉइड ऑटोचा सपोर्ट आहे. याशिवाय इग्निसमध्ये पहिल्यांदा सुझुकी एस-कनेक्ट कनेक्टिव्हिटी फीचर आहे. हे पर्यायी फीचर आहे. इंजिन – अपडेटेड इग्निसमध्ये BS6 कम्प्लायंट, 1.2-लीटर K12 पेट्रोल इंजिन आहे. हे इंजिन 82 bhp ची ऊर्जा आणि 113 Nm टॉर्क निर्माण करते. या इंजिनसोबत 5-स्पीड मॅन्युअल आणि एएमटी गिअरबॉक्सचा पर्याय आहे. -
नव्या इग्निसच्या किंमतीतही बदल झाला असून आता या कारची बेसिक किंमत 4.83 लाख रुपये झाली आहे. तर, इग्निसच्या टॉप व्हेरिअंटची किंमत 7.13 लाख रुपये इतकी आहे. या दोन्ही एक्स-शोरुम किंमती आहेत. पुढे वाचा सर्व व्हेरिअंट्सची किंमत –
-
किंमत किती (एक्स-शोरुम) : इग्निस सिग्मा पेट्रोल BS4 – जुनी किंमत ₹4,74,373 रुपये, नवीन किंमत ₹4,83,320 रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस डेल्टा पेट्रोल BS4 जुनी किंमत₹5,35,645 रुपये, नवीन किंमत ₹5,60,841 रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस जीटा पेट्रोल BS4 जुनी किंमत₹ 5,77,768 रुपये, नवीन किंमत ₹5,83,320रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस अल्फा पेट्रोल BS4 जुनी किंमत₹6,62,994 रुपये, नवीन किंमत ₹6,66,898 रुपये(एक्स-शोरुम किंमत), इग्निस डेल्टा पेट्रोल AMT जुनी किंमत₹5,82,645 रुपये, नवीन किंमत ₹6,07,841 रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस जीटा पेट्रोल AMT जुनी किंमत₹6,24,768 रुपये, नवीन किंमत ₹6,30,320 रुपये(एक्स-शोरुम किंमत) इग्निस अल्फा पेट्रोल AMT जुनी किंमत₹7,09,994 रुपये, नवीन किंमत ₹7,13,898 रुपये(एक्स-शोरुम किंमत)

“कर्म फिरून येतंच…” शेतात आलेल्या सापाला तरुणानं ट्रॅक्टरच्या चाकाखाली अक्षरश: चिरडून टाकलं; सापाचा VIDEO पाहून धक्का बसेल