-
स्नेहा मोहनदास: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या महिलेच्या हाती आपलं ट्विटर अकाऊंट सोपवलं आहे. 'फूडबँक' नावानं स्नेहा एक अभियान चालवतात. बेघर लोकांना जेवण देणं हे ते अभियान आहे. कमीत कमी एका भुकेल्याला आपण जेवण द्यावं आणि जग भूकमुक्त करण्यात योगदान द्यावं असं स्नेहा यांनी म्हटलं आहे. (Photo : file)
-
मालविका अय्यर: या अपंग महिला असून १३ वर्षांच्या असतानाच एका बॉम्बस्फोटात त्यांना आपले दोन्ही हात गमवावे लागले. त्यानंतरही त्यांनी काम करीत आपली पीएचडी पूर्ण केली. कोणतीही गोष्ट सोडून देणे हा पर्याय असू शकत नाही असं त्याचं म्हणणं आहे. त्या इतर अपंग आणि सर्वसामान्यांसाठी प्रेरणास्त्रोत बनल्या आहेत. महिला दिनी त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास आधोरेखित करण्यासाठी पंतप्रधानांनी त्यांची निवड केली. (Photo : file)
-
आरिफा जान: जम्मू आणि काश्मीरच्या रहिवासी असलेल्या आरिफा यांनी काश्मीरची पारंपारिक शिल्पकला पुनर्जिवीत करण्यासाठी प्रयत्न केले. 'नमदा' या शिल्पकलेला जिवंत ठेवण्यामध्ये महिला कारागिरांचा मोठा वाटा असल्याचे त्या सांगतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत पंतप्रधानांनी त्यांची महिला दिनी ट्विटर अकाऊंट चालवण्यासाठी निवड केली. (Photo : file)
-
कल्पना रमेश: या पाणी संरक्षण आणि पावसाच्या पाण्याचे संचयन करण्याचे अभियान चालवतात. पाणी ही निसर्गाची एक अमूल्य देणगी आहे ती आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवणे आपले कर्तव्य असल्याचे त्या सांगतात. त्यासाठी पावसाच्या पाण्यासह दैनंदिन वापरातही पाणी बचतीचा ते संदेश देतात. त्यांच्या या कार्याची दखल घेत पंतप्रधानांनी त्यांची महिला दिनी आपले ट्विटर अकाऊंट चालवण्यासाठी निवड केली. (Photo : file)
-
विजया पवार : विजया या महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील बंजारा समाजाचे प्रतिनिधीत्व करतात. गेल्या दोन दशकांपासून त्या गोरमाटी कलेच्या क्षेत्रात काम करीत आहेत. गोरमाटी कलेला प्रोत्साहन देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आर्थिक मदतही केल्याचे त्या सांगतात. या कार्याची दखल घेत महिला दिनी पंतप्रधानांनी ट्विटर हँडल चालवण्यासाठी केलेली निवड हा मोठा गौरव असल्याचे त्या सांगतात. (Photo : file)
-
कलावती देवी : कानपूरच्या रहिवासी असलेल्या कलावती देवी यांनी महिलांसाठी मोठा संदेश दिला आहे. समाजाला पुढे नेण्यासाठी घरातून बाहेर पडा त्यावर कोणी तुमच्यावर टीका केली तरी त्याला भीक घालू नका, असे सांगतात. निरोगी वातावरणात राहण्यासाठी सार्वजनिक स्वच्छता गरजेची आहे. यासाठी त्यांनी हजारो शौचालये निर्माण केली आहेत. यासाठी त्यांनी दारोदारी फिरुन पैसा गोळा केला. त्यानंतर त्यांना या कार्यात यश मिळालं. त्यांच्या या कार्याची दखल घेत पंतप्रधान मोदींनी त्यांचा आजच्या महिला दिनी गौरव केला आहे. (Photo : file)
मराठी अभिनेत्री होणार सुनील शेट्टीची सून? अहान शेट्टी रितेश देशमुखच्या को-स्टारला डेट करत असल्याच्या चर्चा