-
मागील १८ वर्षांपासून काँग्रेसमध्ये असणारे दिग्गज नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी दिली आहे. ग्वालेहरचे शेवटचे राजे जिवाजीराव शिंदे यांचे नातू आणि काँग्रेसचे नेते माधवराव शिंदे यांचे पुत्र असणाऱ्या ज्योतिरादित्य शिंदे यांनी काँग्रेसला राम राम करुन भाजपामध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला असल्याचे समजते. मात्र मागील अनेक वर्षांपासून राजकारणात असणाऱ्या ज्योतिरादित्य यांच्या पत्नी प्रियदर्शिनी राजे शिंदे या पडद्यामागून त्यांना पाठिंबा द्यायच्या. अनेक निवडणुकींमध्ये ज्योतिरादित्य शिंदे यांच्या निवडणुकीची मोर्चेबांधणीही प्रियदर्शिनीच करायच्या. मात्र त्यांच्याबद्दल खूप कमी लोकांना ठाऊक आहे. आज ज्योतिरादित्य यांनी घेतलेल्या मोठ्या राजकीय निर्णयाच्या पार्श्वभूमीवर प्रियदर्शिनी यांच्याबद्दल जाणून घेऊयात…
-
प्रियदर्शिनी राजे शिंदे या बडोद्यामधील गायकवाड घराण्याच्या राजकुमारी आहेत.
-
प्रियदर्शिनी राजे शिंदे यांचे वडील कुमार संग्राम सिंह गायकवाड हे बडोद्याचे शेवटचे राजे प्रतात सिंह गायकवाड यांचे पुत्र होते.
-
प्रियदर्शिनी राजे शिंदे यांची आईचेही नेपाळमधील राजघराण्याशी नाते आहे.
-
मुंबईमधील फोर्ट कॉनव्हेंट स्कूलमधून प्रियदर्शिनी यांनी आपले शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे.
-
मुंबईतील सोफिया कॉलेजमधून प्रियदर्शिनी यांनी आपले महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केलं आहे.
-
सर्वोत्तम वेशभूषा करणाऱ्या २००८ मधील व्यक्तींच्या व्हिर्व्ही या मासिकाने जाहीर केलेल्या यादीमध्ये प्रियदर्शिनी यांचा समावेश होता.
-
२०१२ साली फेमिना मासिकाने प्रियदर्शिनी यांना जगातील सर्वात सुंदर ५० महिलांच्या यादीमध्ये स्थान दिलं होतं.
-
प्रियदर्शिनी आणि ज्योतिरादित्य यांची पहिली भेट १९९१ साली झाली होती. पहिल्याच भेटीत ज्योतिरादित्य यांना प्रियदर्शिनी आवडल्या होत्या असं म्हटलं जातं.
-
त्यानंतर प्रियदर्शिनी आणि ज्योतिरादित्य वरचेवर एकमेकांना भेटू लागले. पहिल्या भेटीनंतर तीन वर्षांनी म्हणजेच १२ डिसेंबर १९९४ रोजी दोघांनी लग्न केलं.
-
प्रियदर्शिनी आणि ज्योतिरादित्य या दोघांना दोन मुले आहेत.
-
प्रियदर्शिनी आणि ज्योतिरादित्य यांच्या मुलाचे नाव महानआर्यमन आहे.
-
प्रियदर्शिनी आणि ज्योतिरादित्य यांच्या मुलीचे नाव अनन्या आहे.
-
अनन्याला घोडेस्वारी फार आवडते. स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार अनन्या वयाच्या आठव्या वर्षापासून घोडेस्वारी करते.
-
अनन्याने घोडेस्वारी शिकून आपल्या कुटुंबाचा वारसा पुढे चालू ठेवावा अशी प्रियदर्शिनी यांची इच्छा होती असं बोललं जातं.
-
ज्योतिरादित्य यांनी आपले शालेय शिक्षणक डेहराडूनमध्ये पूर्ण केलं आहे. १९९३ साली त्यांनी प्रसिद्ध हार्वर्ड विद्यापीठातून बीए इकोनॉमिक्समध्ये पदवी घेतली.
-
लग्नानंतर सात वर्षांनी म्हणजेच २००१ साली स्टॅनफोर्ड विद्यापीठाच्या ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसमधून ज्योतिरादित्य यांनी एमबीएची पदवी घेतली.
-
माधवराव शिंदे यांच्या मृत्यूनंतर २००२ साली १८ डिसेंबर रोजी ज्योतिरादित्य यांनी काँग्रेसचे सदस्यत्व घेऊन सक्रीय राजकारणामध्ये प्रवेश केला. १९ जानेवारी रोजी त्यांनी पोटनिवडणुकीसाठी गुणा लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. २४ फेब्रुवारीला लागलेल्या निकालामध्ये त्यांनी साडेचार लाखांच्या मताधिक्क्याने विजय मिळवला. ज्योतिरादित्य सक्रीय राजकारणामध्ये आल्यापासून प्रियदर्शनी त्यांच्या पाठिशी ठामपणे उभ्या आहेत.
-
अनेक राजकीय दौरे, स्थानिक स्तरावरील बैठकी, निवडणुक प्रचार दौऱ्यांमध्ये प्रियदर्शनी यांचा सक्रीय सहभाग असतो.
-
मध्य प्रदेशमधील जल विकास आणि उषा किरण पॅलेसची डागडुजी करण्यात प्रियदर्शनी यांच्या पुढाकार घेतला होता. राजमहालामध्ये राहणे हेच माझे काम आहे असं प्रियदर्शनी सांगतात.

बापरे! बघता बघता अख्खा पूल गेला वाहून; गावकरी ओरडत राहिले अन्…पुराचा थरारक VIDEO पाहून धडकी भरेल