
शनिवारी सकाळी गेटवे येथून अलिबागला निघालेली प्रवासी बोट मांडवा बंदराकडे येताना बुडाली. 
या बोटीत ८८ प्रवाशी प्रवास करत होते. -
पण मांडवा पोलिसांच्या कर्तव्यदक्षतेमुळे ८८ प्रवाशांचा जीव वाचला.
-
यावेळी मांडवा पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी देवदूत होऊन धाव घेत प्रसंगावधान राखत केलेल्या कामगिरीमुळे ८८ जणांचा जीव वाचला.
-
पोलीस नाईक प्रशांत घरत
-
प्रशांत घरत यांनी सदगुरु कृपा बोटीतील दोन खलाश्यांच्या मदतीने त्वरित जाऊन बुडणाऱ्या प्रवाशांना वाचविले. त्यामुळे हे तिघे त्याच्यासाठी देवदूतच ठरले.
-
गेटवे येथून सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास अजंठा बोट ८८ प्रवाशांना घेऊन मांडवा बंदराकडे निघाली होती.
-
मांडवा बंदरापासून साधारण १ सागरी मैलावर असताना बोट जोरात कशावर तरी धडकली. थोडय़ा वेळाने ती हेलकावे खायला लागली. बोटीच्या चालकाने बोट पुढे नेण्याचा प्रयत्न केला; परंतु ती बुडण्यास सुरुवात झाली.
-
बोटीच्या खालच्या भागात पाणी शिरण्यास सुरुवात झाली. धास्तावलेल्या स्थितीत सर्व प्रवासी बोटीच्या ‘लोअर डेक’वर आले.
-
मांडवा पोलीस उपनिरीक्षक धर्मराज सोनके यांना माहिती मिळताच त्यांनी सदगुरु कृपा बोटीसोबत पोलीस नाईक प्रशांत घरत यास तातडीने पाठवून दिले. बोटीच्या खलाशानी तातडीने जाऊन त्यांनी व प्रशांत घरत यांनी बुडणाऱ्या ८८ जणांचे प्राण वाचवून त्यांना सुखरूप मांडवा बंदरात सोडले.
-
पोलिसांची गस्ती नौका वेळेवर पोहोचली नसती तर मोठा अनर्थ झाला असता.
-
बोट पोहचण्यास वेळ झाला असता तर ८८ जणांना जलसमाधी मिळाली असती. मात्र बोटीचे खलाशी आणि पोलीस नाईक देवदूता सारखे पोहचल्याने प्रवाशांचे प्राण वाचले.
-
पोलीस नाईक प्रशांत घरत यांनी दाखवलेल्या प्रसंगावधानाचं सगळीकडून कौतुक होत असून राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी त्यांचं कौतुक केलं आहे.
-
रविवारी अनिल देशमुख यांच्या हस्ते प्रशांत घरत यांचा सन्मान करण्यात आला.
-
-
यावेळी अनिल देशमुख यांनी त्यांची आपुलकीने चौकशी करत नेमकं काय घडलं होतं हे जाणून घेतलं.
-
या दुर्घटनेच्या निमित्ताने रामदास बोट दुर्घटनेच्या आठवणी पुन्हा ताज्या झाल्या. १७ जुलै १९४७ साली रामदास बोटीला रेवस बंदराजवळ अपघात झाला होता. वादळामुळे भरकटलेली रामदास बोट रेवसजवळील काश्याच्या खडकावर आदळली होती. या वेळी बोटीतून ७०० प्रवाशी प्रवास करत होते. गटारी अमावास्येच्या दिवशी झालेल्या या दुर्घटनेत बोटीतील ६२५ जणांचा बुडून मृत्यू झाला होता.
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध