-
करोना हा संसर्गजन्य रोग असल्यानं तो वेगानं फोफावत चालला आहे. गर्दी असलेल्या ठिकाणांवरून या रोगाचा जास्त प्रसार होत असल्याचं निदर्शनास आलं आहे. त्यामुळे सरकारनं गर्दीला आवर घालण्याचं काम सुरू केलं आहे. (फोटो : इंडियन एक्स्प्रेस)
-
मुंबईत जमावबंदी आदेश लागू करण्यात आले आहेत. शक्यतो घराबाहेर न पडण्याचं तसेच प्रवास टाळण्याचं आवाहन सरकारकडून केलं जात आहे. ज्यांना गरजेचं आहे, त्यांनी काळजी घेत प्रवास करावा असंही सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे.
-
ज्या शहरात करोनाचे रुग्ण आढळून आले. त्या मुंबई, पुण्यासह राज्यभरात गर्दी टाळण्यासाठी शाळा, महाविद्यालयं, व्यायामशाळा, जलतरण तलाव, चित्रपटगृह, नाट्यगृह बंद ठेवण्याबरोबरच सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्याचे आदेश सरकारनं दिले आहेत.
-
मात्र, मुंबई, पुणे यासारख्या महानगरांमध्ये नागरिकांना महत्त्वाच्या कामानिमित्तानं घराबाहेर पडावं लागत आहे. त्यातही अनेकांना सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा लागत आहे. त्यामुळे लोकल, बस यासारखी प्रवासी वाहतूक करणारी वाहन सुरक्षित आहेत का? असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे.
-
महाराष्ट्रात करोनाग्रस्त रुग्ण आढळून आल्यानंतर राज्य सरकारनं तातडीनं स्वच्छता करण्याचं काम हाती घेतलं. लोकांना स्वच्छता राखण्याचं आवाहन केलं आहे.
-
करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचं लक्षात आल्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची बैठक झाली. याबैठकीत महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. त्यात सार्वजनिक वाहतूक करणाऱ्या वाहनांचाही मुद्दा होता.
-
मुंबईतील लोकल, बेस्ट बससह राज्यातील सर्वच वाहनांची नियमित स्वच्छता करण्याचे आदेश राज्य सरकारनं संबंधित यंत्रणांना दिले. त्यानंतर नियमितपणे सर्व वाहनांचं निर्जंतुकीकरण केलं जात आहे.
-
बसस्थानक, रेल्वे स्थानक, मेट्रो आणि मोनोरेल स्थानकांची नियमित स्वच्छता केली जात आहे.
-
लांब पल्ल्याच्या रेल्वे गाड्यांचीही स्वच्छता राखली जात असून, प्रवाशांना ब्लँकेट न देण्याचा निर्णय रेल्वेनं घेतला आहे. जर ब्लँकेट आवश्यक असल्याचं स्वच्छ असलेलं पुरवलं जात आहे.
-
प्रचंड गर्दी असलेल्या मुंबईचा सगळा भार लोकलवर असतो. लाखो नागरिक दररोज लोकलनं प्रवास करतात. त्यामुळे या प्रवासात करोनाचा संसर्ग होण्याचा धोका जास्त आहे.
-
हा धोका लक्षात घेऊन लोकल गाड्याचीही दररोज स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण केलं जात आहे.
-
करोनाला अटकाव करण्यासाठी विमानतळ, बंदरे, रेल्वे, बसस्थानक येथेही आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे.
-
गाडी शेवटच्या स्थानकावर पोहचल्यानंतर रेल्वेचे कर्मचारी सॅनिटाईजरने खिडक्या, दरवाज्याजवळील खांब, हँडल साफ करत आहेत.
-
लोकल, मेट्रो बंद करण्यात यावी, अशी मागणीही केली जात आहे. मात्र, त्यांची स्वच्छता केली जात असल्याचं सरकारनं म्हटलं आहे.
-
महाराष्ट्रात करोना विषाणूचा शिरकावचं प्रवासातून झाला आहे. दुबईतून आलेल्या नागरिकांना करोनाची बाधा झाली होती. प्रवासादरम्यानं संपर्कात आलेल्या नागरिकांना संंसर्ग झाला. अशाच पद्धतीनं पुणे, मुंबई, ठाणे, नागपूरमध्ये करोना पसरला.

Asia Cup Final Anthem Disrespect: शाहीन आफ्रिदी-हारिस रौफने भारताच्या राष्ट्रगीताचा केला अपमान, मैदानावर पाहा काय करत होते?