-
करोनानं महाराष्ट्रातील चित्रच बदलून टाकलं आहे. करोनाबाधित रुग्णांची संख्या वाढली, तसे सरकार खडबडून जागे झाले. (फोटो : गणेश शिरसेकर)
-
गर्दी हा करोना पसरण्याचा महत्त्वाचा मार्ग. त्यामुळे सरकारनं गर्दीला आटोक्यात आणण्याचं पाऊल उचललं. (फोटो : गणेश शिरसेकर)
-
गर्दी होणाऱ्या सगळ्या संस्थांना सुटी देण्यात आली. ज्या ठिकाणी लोकांची वर्दळ असते, त्याला आवरण्यासाठी जमावबंदी आदेश लागू करण्यात आला. शाळा-महाविद्यालयांसह मॉल्स, व्यायामशाळा, जलतरण तलाव बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले. (फोटो : गणेश शिरसेकर)
-
मंत्रालयात दररोज कामानिमित्तानं लोकांची झुबंड उडते. ही बाब लक्षात घेऊन मंत्रालयात बाहेरून येणाऱ्या नागरिकांना प्रवेश केला. मात्र, या निर्णयाची अनेक नागरिकांना माहिती नाही. तर काहींना महत्त्वाची कामे आहेत. (फोटो : गणेश शिरसेकर)
-
मंत्रालयाचे दरवाजे बाहेरून येणाऱ्या नागरिकांसाठी बंद आहेत. तरी अजूनही नागरिक मंत्रालयात येतात. प्रवेश असल्यानं मात्र लोक ताटकळ उभं राहुन निघून जात आहेत. (फोटो : गणेश शिरसेकर)
-
मंत्रालयात होणारी ही गर्दी काही काळासाठी थांबवायची कशी असा प्रश्न आता सरकारसमोर उभा आहे. (फोटो : गणेश शिरसेकर)
-
सध्या महाराष्ट्रात ३९ करोनाबाधित रुग्ण आहेत. त्यांच्यावर विलगीकरण कक्षात उपचार सुरू आहेत. (फोटो : गणेश शिरसेकर)
-
राज्यात करोनाचा मृत्यूदर शुल्लक असला तरी संसर्ग होण्याचा दर प्रचंड आहे. आठ ते दहा दिवसांत करोनाबाधितांची संख्या दोनवरून ३९ वर पोहोचली आहे. (फोटो : गणेश शिरसेकर)
प्रचंड पैसा, नवं घर, नोकरी…१५ नोव्हेंबरपासून ‘या’ राशींचे नशीब खुलणार; बुध अस्त योगानं भरभराट होणार, पिढ्यानं पिढ्या होतील समृद्ध