-
करोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. भारतातही करोना व्हायरसचे अनेक रूग्ण सापडले आहेत. केंद्र सरकार आणि राज्य सरकार आपापल्या पातळीवर याचा सामना करण्यासाठी सज्ज झाले आहेत. (फोटो : प्रशांत नाडकर)
-
सध्या करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र थर्मल स्क्रीनिंग सुरू करण्यात आली आहे. जाणून घेऊ काय आहे थर्मल स्क्रीनिंग. (फोटो : प्रशांत नाडकर)
-
थर्मल स्क्रीनिंगच्या माध्यमातून करोनाची लागण झालेल्या व्यक्तीची ओळख पटू शकते. याद्वारे करोना असो किंवा अन्य आजाराच्या रुग्णाची ओळख पटवता येते. (फोटो : प्रशांत नाडकर)
-
यातून निघणाऱ्या लहरी मानवी शरीरावर कोणताही अपाय करत नाहीत. तज्ज्ञांच्याच देखरेखीखाली याचा वापर करण्यात येतो. (फोटो : प्रशांत नाडकर)
-
सध्या देशातील अनेक विमानतळांवर तसंच काही रेल्वे स्थानकांवर थर्मल स्क्रीनिंग सुरू करण्यात आलं आहे. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरही थर्मल स्क्रीनिंग सुरू करण्यात आलं आहे. (फोटो : प्रशांत नाडकर)
-
थर्मल स्कॅनर एका इन्फ्रारेड कॅमेऱ्याप्रमाणे काम करतो. व्यक्तीच्या शरीरात असलेले विषाणू छायाचित्रांमध्ये पाहता येतात. (फोटो : प्रशांत नाडकर)
-
विषाणूंची संख्या वाढल्यास व्यक्तीच्या शरीराचं तापमानही वाढतं. त्यावरून एखाद्या विषाणूबाधित व्यक्तीची ओळख पटवता येते. (फोटो : प्रशांत नाडकर)
-
सध्या करोनाचा संसर्ग टाळण्यासाठी सरकारनं योग्य ती खबरदारी घेण्याचं तसंच गर्दीच्या ठिकाणी गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळण्याचं आवाहन केलं आहे. (फोटो : प्रशांत नाडकर)
-
करोनाच्या पार्श्वभूमीवर देशाबाहेरील विमानंही भारतात येण्यास मनाई करण्यात आली आहे. २३ तारखेपासून हा नियम लागू होणार आहे. (फोटो : Financialexpress.com)
-
अनेक ठिकाणी अंशत: लॉकडाऊनही करण्यात आलं आहे. (फोटो : Financialexpress.com)

Asia Cup Final Anthem Disrespect: शाहीन आफ्रिदी-हारिस रौफने भारताच्या राष्ट्रगीताचा केला अपमान, मैदानावर पाहा काय करत होते?