-
करोना विषाणूच्या संकटावर मात करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी जनता संचारबंदी पाळण्याचं आवाहन केलं आहे. डोंबिवलीत नरेंद्र मोदींच्या आवाहनाला नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळत असून रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळत आहे.
-
-
एरवी डोंबविलीत लोकांची प्रचंड गर्दी असणारे रस्ते, बाजारपेठांमध्ये शांतता पसरली आहे.
-
-
डोंबविलीत हे असं चित्र आतापर्यंत कधीच पहायला मिळालं नसेल.
-
-
करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याच्या भीतीने दुकाने आणि कार्यालयांवर निर्बंध घालण्यात आल्याने आधीच रस्त्यांवर शुकशुकाट असताना जनता संचारबंदीचं आवाहन असल्याने लोकांनी घरात थांबणं पसंत केलं आहे.
-
-
गर्दीमुळे एरवी चालण्यासाठी जागा नसणारे रस्ते ओस पडले होते. छोटी-मोठी हॉटेल्स आणि खाद्यपदार्थांची विक्री करणारी दुकानेही बंद आहेत.
-
-
-
-

भारतातील IT क्षेत्र चिंतेत; अमेरिकेत आउटसोर्सिंगविरोधात विधेयक सादर, लाखो नोकऱ्या जाण्याची भीती