-
गुढीपाडव्या निमित्त श्री विठ्ठल-रखुमाई मंदिरात फुलांची मनमोहक आरास
-
चैत्र शुद्ध १ म्हणजेच गुढी पाडवा आणि हा दिवस हिंदू नववर्ष म्हणून ओळखला जातो.
-
हिंदू नववर्षाच्या निमित्ताने श्री विठ्ठल आणि रूख्मिणीमाता मंदिरात फुलांची आरास करण्यात आली आहे आहे.
-
चाफा,मोगरा, गुलाब आणि तुळस अशा १५० किलो फुलांची आरास या मंदिरात करण्यात आली आहे.
-
श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी विठ्ठल जोशी यांनी ही आरास केली आहे.
-
विविध सण, उत्सव अशा दिवसांत येथील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समिती फुलांची आरास करत असते.
-
हिंदू नववर्ष आणि चैत्र गुढी पाडवा या निमित्त आकर्षक फुलांने मंदिरातील गर्भगृह, कमान सजविण्यात आली आहे.
-
सध्या करोनाच्या पार्श्वभूमीवर विठ्ठल मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्यात आलं आहे.
-
विठ्ठल रखुमाई यांची मूर्ती फुलांनी सजवल्यामुळे ती अतिशय मनमोहक दिसत आहे.
-
दरम्यान, देशावर आलेलं करोनाचं संकट दूर करण्यासाठी विठ्ठल रखुमाईच्या चरणी प्रार्थनाही करण्यात आली.

Sharad Pawar : “काय वाट्टेल ती किंमत मोजू, पण…”, शरद पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “महाराष्ट्र एकसंघ राहण्यासाठी…”