-
संचारबंदी असल्यामुळे एरवी गर्दीने ओसांडून वाहणारे मुंबईतील रस्ते सध्या ओस पडले आहेत. ( सर्व फोटो सौजन्य – प्रशांत नाडकर)
-
अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद आहेत. एक कोंबडी विक्रेता सायकलवरुन कोंबडया घेऊन जाताना दिसत आहे.
-
भाजीपाला विक्रेत्याने सायकलवर सामान ठेवण्यासाठी जागा केली असून सायकलवरुन तो भाजीपाला घेऊन जात आहे.
-
कोंबडी आणि भाजीपाला विक्रेता वडाळयातील मार्केटमध्ये विक्रीसाठी चालले आहेत.
-
मुंबईसह महाराष्ट्रात आधीपासूनच लॉकडाउन असताना, पंतप्रधान मोदी यांनी काल रात्री संपूर्ण देशात २१ दिवसांसाठी लॉकडाउन जाहीर केले.
-
धोकादायक करोना व्हायरसचा फैलाव रोखण्याासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.
-
करोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे.
-
महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या १०० च्या पुढे आहे.
-
जीवनावश्यक वस्तूंचा पुरेसा साठा असल्याचे सरकारकडून सांगण्यात येत असले तरी नागरीकांमध्ये चिंता आहे.
-
वस्तुंची टंचाई निर्माण होईल या भितीपोटी नागरीक अन्नधान्यांचा साठा करुन ठेवण्यावर भर देत आहेत.

Apple Event 2025 Updates: आयफोन प्रेमींसाठी खूशखबर! दमदार फिचर्ससह आयफोन 17 सिरीज लाँच; किंमत काय ? लगेच जाणून घ्या