-
करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारीचा उपाय म्हणून सोशल डिस्टन्स ठेवणे अत्यावश्यक आहे.
-
त्याचबरोबर नागरिकांना जीवनावश्यक वस्तू , फळे हेही मिळाली पाहिजेत या उद्देशाने परळी वैजनाथ शहरात पालकमंत्री धनंजय मुंडे यांच्या सूचनेनुसार प्रशासनाने अतिशय उत्तम व्यवस्था केली आहे.
-
शहरातील तोतला मैदानावर सर्व फळ विक्रेत्यांना जागा राखून ठेवले आहेत.
-
दोन ग्राहकांमधील अंतरासाठी गोल वर्तुळाकार केले असून परळीकर अतिशय शिस्तीने त्याला प्रतिसाद देत आहेत.
-
करोना विषाणूचा प्रसार रोखता यावा यासाठी सर्व प्रयत्न प्रशासनाकडून केले जात आहेत.

चषकातील वादळ! आशिया चषक घेऊन नक्वी पसार; बीसीसीआय संघर्षाच्या पवित्र्यात