-
रोजंदारी व कामाची साधने लॉकडाऊनमुळे बंद झाल्याने आपल्या मूळ गावाकडे निघालेला गुजरात व राजस्थान येथील 700 कामगारांना सध्या तलासरी येथील ठक्करबाप्पा विद्यालयात शासनाने आश्रय दिला आहे. (सर्व फोटो सौजन्य : विजय राऊत)
-
राज्य सरकारने लॉकडाऊन घोषित केल्यानंतर मोठ्या राज्यातील विविध भागातील कामगार आपल्या मूळ गावाकडे जाण्यासाठी निघाले होते. गुजरात राज्याने आपला सीमा बंद केल्याने राज्याच्या सीमा भागात हजारो कामगार त्याठिकाणी खोळंबून पडले होते.
-
अधिकतर कामगारांना शासकीय व्यवस्थेने त्यांच्या मूळ ठिकाणी परत पाठवले. मात्र इतर सातशेहून अधिक कामगारांना तलासरी येथील ठक्करबाप्पा विद्यालयात आसरा देण्यात आला आहे.
-
ठक्कर बाप्पा विद्यालयाच्या प्रांगणात हंगामी कॅम्प उभारण्यात आला असून त्या ठिकाणी दानशूर व्यक्तींकडून तसेच शासकीय व्यवस्थेकडून या मंडळींची खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यात येत आहे.
-
या ठिकाणी असलेल्या वैद्यकीय पथकाकडून या कामगारांच्या आरोग्याची तपासणी सुरू करण्यात येत आहे. या कामामध्ये अंगणवाडी सेविका व मदतनीस यांचे सहकार्य घेण्यात येत असून या हंगामी आश्रयस्थाने कामगारांची संख्या वाढत असल्याने प्रशासनासमोर डोकेदुखी वाढत चालली आहे.
-
या हंगामी कॅम्प मधून रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन पळण्याचा काही कामगार प्रयत्न करत असल्याची माहिती पुढे आली असून ही मंडळी एकत्रितपणे राहत असल्याने तलासरी नगरपंचायत करून या भागात औषध फवारणी केली जात आहे. शासनाकडून पुढील आदेश येईपर्यंत या मांडलेल्या तलासरी येथील आश्रय कॅम्पमध्ये ठेवण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे.

तब्बल २७ वर्षांनी शनिदेव जागे होणार! ३ ऑक्टोबरपासून ‘या’ राशींवर येणार संकट; शनीची चाल बदलताच ताकही फुंकून प्यावे लागणार