-
प्रेमापुढे आभाळही ठेंगणं असतं असं म्हणतात. खऱ्या प्रेमाची तुलना करणं शक्यही नाही. म्हणूनच कदाचित जगभरात थैमान घालणाऱ्या करोना व्हायरसमुळे निर्माण झालेली परिस्थितीही यापुढे झुकली असंच म्हणावं लागेल. ही गोष्ट आहे एका वयोवृद्ध जोडप्याची. आजोबांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यातच झालेल्या लॉकडाउनमुळे आजींना त्यांना भेटताही नाही आलं. याचदरम्यान अनेक पत्र लिहून त्यांनी रुग्णालयात असलेल्या आपल्या पतीची विचारपूस केली. यावरून त्यांच्यातील प्रेम दिसून येतं. (सर्व फोटो – हांगझोउ हॉस्पीटल ऑफ ट्रेडिशनल चायनीझ मेडिसिन)
-
चीनमधील हांगझोउ शहरात राहणाऱ्या ८४ वर्षीय हुआंग गुओकी यांचे ९० वर्षीय पती मिस्टर सन यांना गेल्या एक वर्षापासून श्वसनाचा त्रास होत होता. तसंच त्यांना असलेल्या डिमेंशियाच्या आजारामुळे ते रूग्णालयात दाखल आहेत.
-
हुआंग या आपल्या पतीला भेटण्यासाठी रोज रूग्णालयात येत होत्या. त्यांची सेवा करत होत्या. परंतु यादरम्यान, करोना व्हायरसमुळे संपूर्ण शहर लॉकडाउन करण्यात आलं होतं. तसंच रूग्णालयानंही आयसीयूमध्ये लोकांना सोडणं बंद केलं होतं.
-
रूग्णालयातील कर्मचाऱ्यांनी त्यांचं नाव दादी हुआंग आणि दादा सन अशी ठेवली होती. दादी हुआंग या रोज दुपारी किवी हे फळ घेऊन आपल्या पतीला भेटायला येत असत. परंतु १ फेब्रुवारीपासून लॉकडाउन जाहीर करण्यात आल्यानं त्यांना येणं शक्य नव्हतं.
-
त्या आजी रोज येत असल्यानं त्यांना कोणी थांबवतही नव्हतं. त्यांचं आपल्या पतीप्रती असलेलं प्रेम सर्वांच्या परिचयाचं झालं होतं. त्या रोज दुपारी एक पत्र आणि किवी फ्रुट आणून आयसीयू बाहेर असलेल्या नर्सला देऊन जात असतं.
-
आजाराशी लढण्यासाठी आणि माझ्यापासून दूर राहण्यासाठी तुम्हाला तुमचं मन कठोर करावं लागेल. आपली मुलं आणि नातवंड सर्वजण ठीक आहेत. जसं डॉक्टर सांगतील तसंच तुम्ही करा. मी तुमच्यावर खुप प्रेम करते, असं त्या आजींनी आपल्या पत्रात लिहिलं होतं.
-
आजोबाही त्यांनी लिहिलेली पत्र रोज वाचत असंत आणि ती साभाळून ठेवत. नुकतंच जेव्हा लॉकडाउन मागे घेण्यात आलं तेव्हा त्या आजी आजोबांना भेटल्या. त्यावेळी त्यांनी प्रेमानं त्यांची विचारपूसही केली आणि त्यांना त्यांच्या आवडीचं किवी फ्रूटही दिलं.

“…म्हणून मुंबई हल्ल्यानंतर पाकिस्तानवर कारवाई केली नाही”, अमेरिकेचं नाव घेत चिदंबरम यांचा मोठा दावा