-
भिवंडी हा भाग कापडाच्या निर्मितीसाठी ओळखला जातो. या ठिकाणी अनेक कापडाच्या गिरण्या असून शेकडो लोक यांमध्ये काम करतात. सध्याच्या लॉकडाऊनचा मोठा फटका या कामगारांनाही बसला आहे. त्यांचे खाण्या-पिण्याचेही हाल होत आहेत. (सर्व फोटो – दीपक जोशी, ठाणे)
-
एनजीओच्या स्वयंसेवकांनी भात आणि इतर पदार्थ स्वतः शिजवून त्याचे कामगारांमध्ये शिस्तबद्धरित्या वाटपही केले.
-
या कामगारांची ही समस्या लक्षात घेता भिवंडीतील या यंत्रमाग कामगारांना एका स्वयंसेवी संस्थेमार्फत (एनजीओ) जेवणाचे वाटप करण्यात येत आहे.
-
भिवंडीतील खोखा कंपाऊंड येथील गिरणी भागात कामगारांना मंगळवारी जेवण वाटप करण्यात आले.
-
या अन्नदानाचा लाभ घेण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रमाग कामगारांनी रांगा लावल्या होत्या. यावेळी खबरदारीचा उपाय म्हणून प्रत्येकाने तोंडाला मास्क आणि रुमाल बंधले होते.
-
लॉकडाउनमुळे विविध ठिकाणी काम करणाऱ्या कामगारांना, मजुरांना मोठ्या अडचणीला समोरं जावं लागत आहे. अनेकांनी तर आपल्या घरचा रस्ता धरला आहे.

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!