-
राज्यासह देशात करोनामुळे लॉकडाऊन करण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर राज्यातील रक्तपेढ्या ओस पडल्या आहेत. त्यामुळे राज्यातील रक्तपेढ्यांमध्ये अवघे काही दिवस पुरेल एवढाच रक्ताचा साठा उपलब्ध आहे. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
रक्ताच्या तुटवड्यामुळे रुग्णालयातील शस्त्रक्रिया रद्द कराव्या लागतील, हे लक्षात घेऊन दादर प्रभादेवी येथील सिद्धिविनायक मंदिर न्यासाने मुंबईतील सोसायट्यांमध्ये जाऊन रक्तदान शिबिरे आयोजित करण्याची योजना आखली आहे. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
सिद्धीविनायक मंदिर न्यासाचे अध्यक्ष आदेश बांदेकर यांच्यापासून रक्तदानास सुरुवात
-
१ एप्रिलपासून ही रक्तदान योजना सुरु होणार झाली अूसन सकाळी १० ते सायंकाळी ६ यावेळेत ०२२- २४२२४४३८ किंवा ०२२- २४२२३२०६ या नंबरवर सोसायटी पदाधिकाऱ्यांनी रक्तदान शिबिरासाठी सिद्धिविनायक न्यासशी संपर्क साधता येणार आहे. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)
-
या योजनेचा शुभारंभ प्रभादेवी येथील सिद्धीविनायक मंदिर येथूनच करण्यात आला.
-
मोबाईल व्हॅनच्या सहाय्याने बुधवारी रक्तदान शिबिराला सुरुवात करण्यात आली. (छायाचित्र – निर्मल हरिंद्रन)

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!