निष्ठेनं नि कष्टानं कोणतेही काम केलं तर त्यातून सुंदर मुर्ती उभारता येते हे दगडफोड्याच्या मुलानं दाखवून दिलं आहे. सोलापूर जिल्ह्यातील वैरागजवळील साधरण तीन-चारशे उंबऱ्याच्या गावात वाढलेल्या मुलानं आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचं सोनं केलेय. आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण सासवडच्या उप विभागीय पोलीस अधिकाऱ्याच्या (DYSP पोलीस उपअधीक्ष) संघर्ष, मेहनत, कष्ट आणि चिकाटीचा प्रवास पाहणार आहोत…. पुणे ग्रामीण पोलिसांत उपविभागीय आधिकारी म्हणून अण्णासाहेब मारूती जाधव सध्या कार्यरत आहेत. काम करण्याच्या जाधव यांच्या शैलीमुळे सासवडमधील नागरिकांमध्ये आनंदाचे आणि सुरक्षेचे वातावरण आहे. तिशीतला तरूण पोलीस आधिकारी मिळाल्यामुळे सासवड भागांमधील तरूणांमध्येही एक वेगळीच उर्जा आली आहे. अख्खी हयात दगडधोंडे फोडण्यात घालवलेल्या बापाचं कष्टाचं शेवटी जाधव यांनी सोनं करून दाखवलं आहे. पण यासाठी अण्णासाहेब जाधव यांना करावा लागणारा संघर्ष पाहून तुमच्या आमच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही…. अण्णासाहेब यांनी अनेक तरूणांना दाखवून दिलं की, मनात जर ध्येय असेल तर तुम्हाला कोणीच अडवू शकत नाही….इच्छाशक्तीच्या बळावर अनेक अडचणींचा सामना करत तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत पोहचू शकता…फक्त तुम्हीला त्यासाठी अतोनात प्रयत्न करावे लागतील… -
सर्वसामान्य कुटुंबात अण्णासाहेब वाढला..आई-वडिलांनी दगडफोडून पोराला शिकवलं. १५ वर्ष उन्हात माळरानावर काळ्याकट्ट पाषाणावर घाव घालून कुटुंबाची उपजिविका भागवत मारूती जाधव यांनी संघर्ष केला अन् दोन्ही पोरांना उच्चशिक्षित केलं
आई-बापाचा कडाक्याच्या उन्हात पडत असलेला घाम पाहून अण्णासाहेब जाधव आपल्या ध्येयाच्या दिशेने आणखीनच पेटून उटला होता. वयाच्या २५ व्या वर्षी अण्णासाहेब यांनी एकदा दोनदा नव्हे तब्बल सगल पाच वेळा राज्यसेवा परिक्षेत यश मिळवलं आहे. मंत्रालय सहायक, वित्त लेखा अधिकारी, नायब तहसीलदार यासारखी पद त्यांनी सोडली. अण्णासाहेब जाधव यांनी सर्जापूरच्या आश्रम शाळेत ९० टक्के गुण घेऊन अव्वल अव्वल क्रमांक पटकावला होता. बारावीनंतर इंजिनियरंगचं शिक्षण घ्यायचं होतं मात्र फक्त ८००० रूपये फीसाठी नसल्यामुळे प्रवेश घेता आला नाही. फीसाठी पैसे नसल्यामुळे त्यावेळी अण्णा दोन दिवस घरातून बाहेर निघाला नाही…डोळ्यातून अश्रू काही थांबत नव्हते…पण प्रश्न तसाच राहिला… अखेर नाईलाजास्तव अण्णानं मुक्त विद्यापीठातून शिक्षण घ्यायचं ठरवलं. पदवीला प्रवेश घेतला…शिक्षणाबरोबर कामही सुरू केलं. शिक्षण, अभ्यास आणि बिगारी असं करत करत अण्णा आपल्या धेयाच्या दिशेनं जात होता… दिवसभर बिगारीचं काम आणि रात्री अभ्यास हा त्याचा नित्याचा दिनक्रम होता…तो कधीच थकला नाही….मित्रमंडळी त्याला म्हणायचे…..इतका अभ्यास करून काय करणार….तो शांत बसयचा…त्याच्या निकालानं सगळ्यांना दाखवून दिलं… पदवीनंतर अण्णानं १४-१४ तास स्वत:ला पुस्तकात झोकून दिलं. स्पर्धा परिक्षेची पुस्तकंही घेण्याइतकही पैसे नव्हते… कधी मित्राची तर कधी जुन्या बाजारातील पुस्तकं घेऊन अभ्यास केला…पण मनातील जिद्धीची आग विजू दिली नाही…पहिल्याच प्रयत्नात त्यानं राज्यसेवा परिक्षेत यश मिळवलं…. राज्यसेवा परिक्षेत पहिला येत अण्णाने सर्वांना चकित केले पण हे त्याचं यश होतं….आई-वडिलांच्या त्या पाठिंब्याचं यश आहे…आज एक आदर्श पोलिसावाला म्हणून अण्णा आपले कर्तव्य पार पाडत आहे… अण्णानं स्वतचं स्वप्न छाटा भाऊ शेखर याला इंजिनिअर करून पुर्ण केलं. अण्णासाहेब जाधव आज तरूणांसोमर एक आदर्श आहे…त्यांच्या काम करण्याच्या शैलीमुळे सासयवड येथील प्रत्येकजण खूश आहे. लॉकडाउनमुळे सासवड येथील काही गरिब आणि अनाथ लोकांवर उपाशी राहण्याची वेल आली होती. त्यावेळी परिस्थितीचं भान राखत अण्णासाहेब यांनी स्वखर्चानं आणि स्वत:च्या हातानं त्यांना जेवण खाऊ घातले. अण्णासाहेब जाधव यांच्यातील साधेपणा कायम लोकांना आपलसं करून जातो…त्याच्या जिद्दीची कथा आजच्या अनेक तरूणांना नक्तीच उर्जा देऊन जाईल…. (सर्व फोटो : अण्णासाहेह जाधव यांच्या फेसबुकवर घेतले आहेत.)

बाबा वेंगांची सर्वात मोठी भविष्यवाणी; डिसेंबर २०२५ पर्यंत ‘या’ ३ राशींचे लोक होणार गडगंज श्रीमंत? होणार अचानक धनलाभ!