-
देशभरात इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रालाही करोनाचा फटका बसला आहे. पुण्यात आतापर्यंत करोनामुळे अनेक रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे बाजार समितीतील व्यापाऱ्यांनी शुक्रवारपासून बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. (छाया – अरुल हॉरिझॉन)
-
समितीच्या प्रवेशद्वारावरच विशेष बोर्ड लिहून या निर्णयाची माहिती सर्वांना देण्यात आलेली आहे. (छाया – पवन खेंगरे)
-
गाळ्यांसमोर गिऱ्हाईकांसाठी केलेलं हे मार्किंग बरंच काही सांगून जातंय… (छाया – अरुल हॉरिझॉन)
-
एरवी व्यापारी, शेतकरी आणि ग्राहकांमुळे फुलून जाणाऱ्या या भागात सध्या भयाण शांतता पसरलेली आहे. (छाया – अरुल हॉरिझॉन)
-
व्यापाऱ्यांनी घेतलेल्या या निर्णयाचा फटका सामान्य पुणेकरांना बसण्याची शक्यता आहे. शहरात स्थानिक भाजीवालेही सोशल डिस्टन्सिंगचं भान ठेवताना दिसत आहे. (छाया – पवन खेंगरे)
-
पुणे-सातारा रस्त्यावर पद्मावती भागात भाजी खरेदी करण्यासाठी झालेली लोकांची शिस्तबद्ध गर्दी… (छाया – पवन खेंगरे)
-
बाजार समिती शुक्रवारपासून अनिश्चित काळासाठी बंद असल्यामुळे जास्तीत जास्त भाजीपाला खरेदी करण्याकडे पुणेकरांचा कौल दिसत होता. (छाया – पवन खेंगरे)
-
सध्या सर्वत्र भीतीचं वातावरण असल्यामुळे सरकार करोना विषाणूवर लवकर काहीतरी उपाय शोधेल अशी सर्व जण प्रार्थना करत आहेत. (छाया – पवन खेंगरे)

“…तर उद्याच भारताची २५ टक्के टॅरिफमधून सुटका”, डोनाल्ड ट्रम्प यांच्या सल्लागाराचं मोठं विधान; घातली ‘ही’ अट!