-
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी केंद्र सरकारने संपूर्ण देशात लॉकडाउनची घोषणा केली आहे. जिवनावश्यक सेवा वगळता सर्व गोष्टी या काळात बंद राहणार आहे. मात्र हातावर पोट असणाऱ्या मजूरवर्गाला या लॉकडाउनचा चांगलाच फटका बसला आहे. (सर्व छायाचित्र – पवन खेंगरे)
-
मध्य प्रदेशातील बिरवानी जिल्ह्रयातील दोन कामगारांचा परिवार सध्या पुण्यात अडकला आहे. आपल्या गावापासून दूर अडकलेल्या या मजुरांनी पुणे ते मध्य प्रदेश पायी चालत जायचं ठरवलं.
-
सोमवारी रात्री पुणे-सातारा रस्त्यावर पोलिस आणि सरकारी अधिकाऱ्यांनी या परिवारांना बाहेर जाण्यापासून रोखलं.
-
खांद्यावर बॅग, डोक्यावर ओझं आणि सोबतीला आपली लहानगी लेकरं घेत हे कामगार सध्या पुण्यात रस्त्यावर आले आहेत
-
पुण्यात करोना बाधित रुग्णांची संख्या प्रत्येक दिवशी वाढत असून…अनेक लोकांना या विषाणूमुळे आपले प्राणही गमवावे लागले आहेत
-
अशा परिस्थितीत मजुरांनी पायी प्रवास करणं हे प्रत्येकासाठी धोकादायक होतं
-
अडचणीच्या काळात गरजू, गरीब व्यक्तींना मदत करा असं आवाहन सरकारतर्फे करण्यात येत आहे. मात्र परक्या शहरात प्रत्येकाच्या नशिबाला आसरा येईल याची शाश्वती नसते. अशा परिस्थितीत गावची ओढ माणसाला शांत बसू देत नाही.

Dussehra Wishes 2025: दसऱ्याला प्रियजनांना पाठवा मराठी शुभेच्छा! WhatsApp, Instagram, Facebook वर शेअर करा PHOTOS