-
सध्या संपूर्ण देशभरात लॉकडाउन सुरु आहे, श्रीनगरचं ट्युलिप गार्डन विविध फुलांनी बहरुन गेलं आहे. मात्र यंदा पर्यटक इकडे फिरुच शकत नाहीयेत. (सर्व छायाचित्र – शोएब मसुदी)
-
२००७ साली हे गार्डन सुरु करण्यात आलं. त्यावेळपासून इकडे प्रत्येक वर्षी फुलं पाहण्यासाठी हजारो पर्यटक येत असतात. परंतु यंदा लॉकडाउनमुळे पहिल्यांदाच ट्युलिप गार्डनवर अशी वेळ आली आहे.
-
ट्युलिप गार्डन हे जम्मू-काश्मिरच्या पर्यटन स्थळांपैकी महत्वाचं ठिकाण मानलं जातं. मात्र लॉकडाउनमुळे बाहेरील पर्यटक न येऊ शकल्यामुळे यंदा इथे अजिबात गर्दी दिसत नाहीये.
-
आशिया खंडातील सर्वात मोठ्या गार्डन्सपैकी एक अशी ट्युलिप गार्डनची ओळख आहे.
-
२००७ साली तत्कालीन मुख्यमंत्री गुलाम नबी आझाद यांनी काश्मिरमध्ये पर्यटनाला चालना मिळण्यासाठी हे गार्डन सुरु केलं होतं.
-
ट्युलिप व्यतिरीक्त अनेक प्रकाराची फुलं या गार्डनमध्ये बहरतात.
-
गार्डनसमोरील पर्वतरांगा निसर्गाचं मनमोहक रुप पाहण्यासाठी यंदा पर्यटकच नसल्यामुळे इथल्या व्यवसायावरही परिणाम झाला आहे.

Donald Trump : ‘तर पुन्हा १९२९ सारखी महामंदी येईल’; ट्रम्प यांचा टॅरिफच्या मुद्द्यावर अमेरिकन न्यायालयांना इशारा