-
संग्रहित छायाचित्र
-
पहिल्या आठ जणांच्या चाचणीतून ही लस सुरक्षित आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवत असल्याचा निष्कर्ष काढण्यात आला आहे.
-
सध्या मुंबई रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे २० एप्रिलनंतर काही प्रमाणात देण्यात आलेली शिथिलताही राज्य सरकारनं मुंबई-पुण्यात रद्द केली आहे. दररोज मुंगीलाही जाण्यासाठी वाट न भेटणाऱ्या मुंबईतील रस्त्यावर शुकशुकाट आहे.
-
पुण्यातही करोना रुग्णांची संख्या मोठी आहे. त्यामुळे शहरातील अनेक भाग सील करण्यात आले आहेत. तर करोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेल्यांच्या चाचण्याही सरकारकडून करण्यात येत आहे.
-
राज्यात काही भागात करोनाग्रस्तांची संख्या जास्त आहे. तर काही जिल्ह्यात एकही करोनाचा रुग्ण नाही. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांमधील व्यवहार बंद न ठेवता, ज्या जिल्ह्यात करोनाचा शिरकाव झालेला नाही. अशा जिल्ह्यात व्यवहार सुरू करण्यासाठी सरकारकडून पावलं उचलली जात आहेत.
-
या सरकारनं करोनाच्या स्थितीनुसार जिल्ह्यांचं झोनमध्ये वर्गीकरण केलं आहे. यात रेड, ऑरेंज, ग्रीन असे तीन झोन निश्चित करण्यात आले आहेत.
-
संग्रहित छायाचित्र
-
२८ दिवस नव्यानं एकही रुग्ण आढळून आला नाही, असा जिल्हा ग्रीन झोनमध्ये वर्ग केला जातो.
-
केंद्र सरकारनं २० एप्रिलनंतर काही व्यवहारांना शिथिलता दिली. त्यानंतर राज्य सरकारनं ऑरेंज आणि ग्रीन झोनमधील उद्योग कर्मचारी आणि कामगारांच्या आरोग्याची काळजी घेत सुरू करण्याची परवानगी दिली आहे.
-
हे उद्योग सुरू करताना कर्मचाऱ्यांच्या राहण्यासह सर्व व्यवस्था कामाच्या ठिकाणीच करण्यात आली आहे. राज्यातील काही जिल्हे रेड झोनमधून हळूहळू ऑरेंज झोनच्या काठावर पोहोचले आहेत.

६.३० वाजता जेवण, प्रत्येक सोमवारी उपवास अन्…; अक्षय कुमारने सांगितले फिटनेस सिक्रेट; म्हणाला, “रविवारी रात्री जेवल्यानंतर मी थेट…”