-
करोना विषाणूचा सामना करण्यासाठी सध्या संपूर्ण देशभरात ३ मे पर्यंत लॉकडाउन वाढवण्यात आलेलं आहे. देशातील महत्वाची शहरं या काळात बंद आहेत. (सर्व छायाचित्र – I am Sikh फेसबूक पेज)
-
पंजाबमधील अमृतसर शहरात सध्या लॉकडाउनमध्ये अशा प्रकारचं चित्र पहायला मिळतं आहे.
-
वर्दळीचे रस्ते सध्या रिकामे झाले आहेत, त्यामुळे शांत झालेल्या शहराला एक वेगळंच सौंदर्य प्राप्त झालेलं आहे.
-
परदेशातील शहरांना लाजवेल अशा प्रकारे अमृतसर शहर सध्या दिसत आहे.
-
इतर राज्यांप्रमाणे पंजाबलाही करोना विषाणूचा फटका बसलेला आहे. अमृतसर शहरही या विषाणूच्या विळख्यातून सुटलेलं नाही.
-
सध्या संपूर्ण शहरात कडेकोट बंदोबस्त असून रुग्णांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
-
मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह या काळात सर्व शहरातील परिस्थितीवर लक्ष ठेवून आहेत.
-
लॉकडाउनचा शहरातील अनेक उद्योगधंद्यांवर परिणाम होताना दिसतो आहे.
-
काही दिवसांपूर्वी अमृतसरमधील एकाच परिवारात सहा जणांना करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.
-
आतापर्यंत पंजाब राज्यात दोनशेपेक्षा जास्त रुग्णांना करोनाची लागण झालेली असून काही जणांनी यात आपले प्राणही गमावलेले आहेत.

शनी-शुक्राची युती देणार पदोपदी यश; मीन राशीतील अद्भूत संयोग मिळवून देणार अपार पैसा अन् धनसंपत्तीचे सुख