-
मुंबई : मुंबईत दिवसेंदिवस करोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत असताना राज्य शासनाकडून युद्धपातळीवर क्वारंटाइन सुविधा निर्माण केल्या जात आहेत. यासाठी नेस्को कंपनीनं देखील पुढाकार घेतला आहे. (सर्व छायाचित्रे – अमित चक्रवर्ती)
-
नेस्कोनं त्यांच्या गोरेगाव येथील तीन जागा मुंबई महापालिकेला उपलब्ध करुन दिल्या आहेत. या ठिकाणी महापालिकेच्यावतीने अतिरिक्त क्वारंटाइन कक्ष उभारण्यात येत आहेत.
-
या ठिकाणी फिजिकल डिस्टंसिंगचा वापर करीत सुमारे १२०० ते १५०० रुग्णांची सोय होऊ शकणार आहे.
-
या क्वारंटाइन कक्षांमध्ये प्रत्येक बेडसोबत एक खुर्ची आणि पंखा देखील उपलब्ध करुन देण्यात आला आहे.
-
त्याचबरोबर बाथरुम, टॉयलेट या सुविधांसाठी व्यवस्थितपणे दिशादर्शक तयार करण्यात आले आहेत.
-
योग्य प्रकारे फिजिकल डिस्टंसिंग राखून इथं बेड्सची सोय करण्यात आली आहे.
-
नेस्को आणि महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी मिळून या ठिकाणी सर्व बेड व्यवस्थितरित्या तयार केले आहेत.
-
या कामात व्यस्त असलेल्या स्वयंसेवकांनी तोंडाला मास्क बांधून व्यवस्थित काळजी घेतल्याचे दिसते.
-
मोठ्या गोडाऊनमध्ये क्वारंटाइनची सोय करण्यात आल्यानं, उकाड्याचा त्रास होऊ नये म्हणून प्रत्येक बेडसोबत एका पंख्याची सोय करण्यात आली आहे.

राहुल देशपांडेंनंतर प्रसिद्ध अभिनेत्रीने केली घटस्फोटाची घोषणा, १५ वर्षांचा संसार मोडला