-
करोना विषाणूचा प्रादूर्भाव आणि लॉकडाउन या दुहेरी पेचात अडकलेल्या देशभरातील मजूर वर्गाला अखेरीस एक चांगली बातमी मिळाली आहे. केंद्र सरकारने मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी परवानगी दिली आहे. ( सर्व फोटो – प्रशांत नाडकर)
-
राज्यभरासह देशातील अनेक महत्वाच्या शहरांत अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी पाठवण्यासाठी विशेष रेल्वे गाड्या रवाना झाल्या आहेत.
-
पण ज्यांना रेल्वेचा प्रवास शक्य नाही, त्यांनी पायी चालत जात किंवा सायकलवरुन आपलं गाव गाठायचं ठरवलं आहे.
-
मुंबई-आग्रा महामार्गावरुन आपल्या गावाकडे निघालेले कामगार, आता काही झालं तरी लवकरात लवकर आपलं गाव गाठायचं ही भावना प्रत्येकाच्या मनात असते.
-
चालत प्रवास हा नक्कीच सोपा नाही, उन्हाने बेजार झालं की रस्त्याच्या कडेला डोक्यावर टोपी किंवा रुमाल बांधून उभं रहायचं.
-
काही कामगारांनी तर थेट सायकलवरुन आपलं गाव गाठायचं ठरवलं आहे.
-
संकट कितीही मोठं असलं तरी जीवन हे सायकल प्रमाणेच असतं. चालत राहणं भाग आहे याची सर्वांना जाणीव आहे.
-
सायकल चालवून जीव थकला की मध्ये थांबायचं, सोबत असलेलं पाणी प्यायचं थोडा आराम करायचा हे सर्व कामगारांनी आता ठरवलं आहे.
-
नावापुरते पोटात दोन घास गेले आणि सोबतीला पाण्याची एक बाटली घेतली की हे कामगार लगेच पुढच्या प्रवासाला लागतात.
-
रस्त्यात जिथे पाणपोई दिसेल तिकडे थांबायचं, सायकल रस्त्यावर आडवी टाकायची आणि पाणी भरुन घ्यायचं
-
एवढ्या मोठ्या प्रवासात सायकल आणि पाण्याची बाटली हेच या कामगारांचे सच्चे साथीदार आहेत.
-
पाणी भरलं की परत सायकल चालवत पुढचा प्रवास सुरु करायचा. काही केल्या आता शहरात थांबायचं नाही हे या कामगारांनी आता जणू ठरवूनच टाकलं आहे.

मृत्यूचा लाईव्ह VIDEO! बाहेर कुठेही मसाज करुन घेताना सावधान! मानेची चुकीची शीर दाबली अन् महिलेचा जागीच जीव गेला