-
पुण्यातील जुना भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कसबा पेठेत सध्या करोना लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर सर्वत्र शुकशुकाट जाणवत आहे. ( सर्व फोटो – पवन खेंगरे )
-
पुण्यात दिवसेंदिवस वाढणाऱ्या करोनाच्या रुग्ण संख्येमुळे नागरिकांची चिंता वाढली आहे.
-
शहराचा बहुतांश भाग हा प्रतिबंधित क्षेत्रात समाविष्ट झालेला आहे.
-
पुण्यातील पेठांचा परिसर असलेल्या ठिकाणी देखील मोठ्या प्रमाणावर करोनाचे रुग्ण आढळले आहेत.
-
करोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या या भागांमध्ये सध्या लॉकडाउनचे तंतोतंत पालन केले जात आहे
-
राज्यात मुंबई नंतर करोनाबाधितांच्या संख्येत पुण्याचा क्रमांक लागतो.
-
पुण्यात करोनाग्रस्त रुग्णांची संख्या ३ हजारांच्या घरात पोहोचली असून, त्यात दररोज भर पडत चालली आहे.
-
पुणे शहरातील ६९ प्रतिबंधित क्षेत्रामध्ये आज मध्यरात्रीपासून ते १७ मेपर्यंत पूर्णपणे सर्व प्रकारची दुकानं बंद राहणार आहेत.
-
त्या क्षेत्रात केवळ दवाखाने सुरु राहणार असून, भाजीपाला, दूध हे पोलीस आणि महापालिका प्रशासन गरजेनुसार स्वतः पुरवठा करणार आहेत.
-
पुणेकर नागरिकांनी येत्या काळात अधिक काळजी घेणे आवश्यक असल्याचं आजच्या आकडेवारी वरून स्पष्ट झाले आहे.

Pakistan President: पाकिस्तानात लष्करी उठाव? लष्करप्रमुख असीम मुनीर नवे राष्ट्रपती होण्याची शक्यता