-
इतर राज्यांत अडकलेल्या मजुरांना घरी जाण्याची परवानगी मिळाल्यानंतर मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनन्स स्थानकाबाहेरील परिसरात जमा झालेली परप्रांतीय कामगारांची गर्दी. (सर्व छायाचित्र – प्रशांत नाडकर)
-
उत्तर प्रदेश-बिहार यासह अन्य राज्यातील कामगार घरी जाण्यासाठी सामान घेऊन तयार झाले आहेत.
-
रेल्वे प्रशासनाने या कामगारांसाठी विशेष श्रमिक एक्सप्रेस गाड्यांची सोय केली आहे.
-
आपल्या वडिलांच्या कुशीत झोपलेली चिरडी…काही दिवसांपूर्वी हिच्या डोळ्यात मुंबईबद्दलचं एक वेगळंच चित्र असेल पण करोनामुळे होत्याचं नव्हतं झालं..
-
रेल्वे स्थानकाबाहेर कामगारांना आपली माहिती व फॉर्म भरुन द्यावा लागत आहे.
-
कागदपत्र व इतर बाबांची पूर्तता झाली की नाही हे तपासण्याचं काम मुंबई पोलीस करत आहेत.
-
तोपर्यंत रणरणत्या उन्हात स्वतःचा बचाव करत हे कामगार वाट पाहत बसतात.
-
कारण परिस्थितीने त्यांच्यासमोर वाट पाहण्याशिवाय कोणताही पर्याय शिल्लक ठेवलेला नाही.
-
रस्त्याच्या कडेला कुठेही सावली दिसली की कामगार तिकडे आराम करायला थांबतात
-
माहिती भरुन दिलेल्या कामगारांना इथे अशा पद्धतीने खास टोकन देण्यात येत आहे
-
जितकी रांग ही आत असते त्याच्या दुप्पट बाहेर असते.
-
CSMT रेल्वे स्थानक, आजुूबाजूचा परिसर, आझाद मैदान भागात कामगार रस्त्यावर थांबत आपला नंबर कधी येईल याची वाट पाहत असतात
-
उन्हापासून स्वतःचं संरक्षण करण्यासाठी प्रत्येकाने आपली सोय केलेली असते.
-
आपल्या लहानग्या बाळाला उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून विशेष काळजी घेताना आई
-
आतापर्यंत या कामगारांनी अनेक हालअपेष्टा सोसल्या आहेत.
-
मोठ्या कालावधीनंतर केंद्राने आपल्या घरी जायची परवानगी दिल्यानंतर, आता गाडीची वाट बघत बसायची हेच या कामगारांच्या हातात उरलंय.
-
अशा खडतर परिस्थितीत वृद्ध लोकांना मदत करण्याचं भान या कामगारांनी अजुन जपून ठेवलंय. मुंबई शहर प्रत्येकाला काही ना काही शिकवतच…
-
होतं नव्हतं ते सगळं सामान सोबत घेऊन घरची आस या कामगारांना लागलेली आहे.
-
मुंबईच्या विविध भागातून या कामगारांना बेस्ट बसच्या सहाय्याने CSMT भागात आणलं जात आहे.
-
चार पैसे अधिक मिळावे म्हणून हे कामगार या मुंबई शहरात येतात. मात्र सातासमुद्रापार तयार झालेल्या एका विषाणूने क्षणार्धात या असंख्य कामगारांची स्वप्न धुळीला मिळवली आहेत
-
अखेरीस मायानगरी मुंबईला रामराम करत गड्या आपला गावच बरा असं म्हणण्याची वेळ या कामगारांवर आलीये.
-
रांगेत उभं असताना दिवसांत करोनाविषयक घडामोडींचा आढावा घेताना दोन कामगार

Donald Trump : भारत-पाकिस्तान युद्धात किती विमानं पाडली? डोनाल्ड ट्रम्प यांच्या नव्या दाव्यामुळे विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह