-
लॉकडाउन काळात केंद्र सरकारने इतर राज्यात अडकलेल्या मजुरांना प्रवासाची अखेर परवानगी दिली. यानंतर मुंबई,पुणे यासारख्या महत्वाच्या शहरांमधून कामगार व मजुरांचा लोंढा आपल्या मूळ गावी परत निघाला आहे. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझॉन)
-
छत्तीसगड, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश यासारख्या राज्यांमधून अनेक कामगार पुणे शहरात बांधकाम मजूर म्हणून येत असतात.
-
लॉकडाउन काळात रोजगार तुटल्यानंतर आपला संसार पाठीवर घेऊन मिळेल त्या वाहनाने आपलं घर गाठण्यासाठी हे कामगार रात्री प्रवासासाठी बाहेर पडतात.
-
यामध्ये महिला कामगारांना फार त्रासाला सामोरं जावं लागत आहे. आपल्यासोबत आपल्या मुलांची काळजी घेणं ही मोठी जबाबदारी यांच्यावर आहे.
-
पुणे -अहमदनगर मार्गावर आपल्या मुलाला सोबत घेऊन वाहनाची वाट पाहणारी आई
-
मध्येच एखादा ट्रक किंवा टेम्पो आला की आपल्याजवळील आहेत-नाहीत तेवढे सर्व पैसे त्याला द्यायचे आणि प्रवासाला सुरुवात करायची…देशातील बहुतांश मजुरांसाठी हा दिनक्रमच बनलाय.
-
ज्यांना कोणतंही वाहन मिळत नाही मग अखेरीस रस्त्यातील दुकानांच्या शटरखाली झोपण्याचा माग्र स्वीकारतात
-
रोजगारासाठी शहरांकडे आलेल्या या मजुरांवर परिस्थितीने वाईट वेळ आणली आहे.
-
सकाळी उन्हाचा वाढता प्रकोप लक्षात घेता रात्री प्रवास करणं या कामगारांना सोयिस्कर जातं.

CM Devendra Fadnavis: “उद्धव ठाकरे तुम्हाला इकडे यायचे असल्यास…”, मुख्यमंत्री फडणवीसांची सभागृहातच ऑफर, नेमके काय म्हणाले?