शुक्रवारी १२ जून रोजी देहू येथील संत तुकाराम मंदिरात ३३५ वा पालखी प्रस्थान सोहळा संपन्न होणार आहे. श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र देहू येथुन १२ जून व श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा श्री क्षेत्र आळंदी येथुन १३ जून रोजीच्या प्रस्थान सोहळयास या दोन दिवसांसाठी परवानगी देण्यात आलेली आहे. -
सरकारने सांगितलेल्या नियमांनुसार पालखी सोहळा होणार आहे.
५० जणांच्या उपस्थिती हा सोहळा पार पडणार आहे. दरवर्षी हजारोंच्या संख्येनं उपस्थित असणारे वारकरी यंदा देहू नगरीत दिसले नाहीत. शुक्रवारी देहू नगरीमध्ये शांतता पाहायला मिळाली. -
दरवर्षी देहू नगरी ग्यानबा तुकाराम नामाने दुमदुमून जायची. लाखो वारकरी अवघ्या महाराष्ट्रातून येतात
मात्र यावर्षी करोना संकटामुळे वारकरी संप्रदाय यांना देहू नगरीत न येण्याचे आवाहन देहू च्या विश्वस्थानकडून केले होते. देहू नगरीत शुकशुकाट होता. -
पालखी सोहळा प्रस्थानावेळी उपस्थित राहण्यास परवानगी देण्यात आलेल्या सर्व नागरिकांनी मास्क वापरणे, स्वच्छता व निर्जंतुकीकरण इत्यादी नियमांचे पालन करुन, दोन्ही पालखी सोहळ्याच्या प्रस्थान मंदीर परिसराच्या आतमध्ये परवानगी देण्यात आली आहे,

मुख्यमंत्री फडणवीस-राज ठाकरे यांची अचानक भेट, संजय राऊत यांची मोठी प्रतिक्रिया; म्हणाले, “हा राजकीय अपराध…”