-
करोनाचं संकट असल्याने यावर्षीची पायी वारी रद्द करण्यात आली आहे.
त्यामुळे ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका मुख्य मंदिराच्या प्रदक्षिणा घालून आजोळ घराच्या देऊळवाड्यात विसावणार आहेत. ३० जूनला शासनाने दिलेल्या पर्यायांपैकी एका पर्यायाचं अवलंब करून पादुका पंढरपूरला घेऊन जाण्यात येणार आहेत. -
आळंदीमध्ये दरवर्षी वैष्णवांचा मेळा भरला जातो.
मात्र, करोनामुळे या वर्षीचा पायी आषाढी वारी सोहळा रद्द करण्यात आला आहे. दर वर्षी आळंदीमध्ये लाखो वारकरी दाखल होतात. आळंदीमध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर जमावबंदी लागू करण्यात आलेली असून मंदिर परिसरात निर्बंध घालण्यात आलेले आहेत. अवघा मंदिर परिसर हा टाळ मृदंगाच्या निनादात आणि ज्ञानबा माऊली तुकारामाच्या जयघोषाने दुमदुमून गेला होता. -
ज्ञानेश्वर माऊलींच्या पादुका
-
यावर्षी पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालायकडून अवघ्या महाराष्ट्रातील वारकरी संप्रदायाला करोनाच्या पार्श्वभूमीवर आळंदीत न येण्याचे आवाहन केले होते.
-
रांगोळीतून दिला सामाजिक संदेश

“मला पंडितांकडे जायचंय”, पूर्णा आजीचं वाक्य ऐकून सुन्न झालेली जुई गडकरी; म्हणाली, “वाटलं होतं तू परत येशील…”