-
लॉकडाउन काळात इतर राज्यांत अडकलेल्या परप्रांतीय कामगारांना घरी जाण्यासाठी केंद्र सरकारने परवनागी दिली. या कामगारांसाठी रेल्वे मंत्रालयाने विशेष गाड्यांची सोयही केली. गेल्या काही दिवसांमध्ये परिस्थिती मार्गावर येण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरु आहेत. अजुनही पुणे शहरातून परप्रांतीय कामगारांचं स्थलांतर सुरुच आहे. (सर्व छायाचित्र – अरुल हॉरिझोन)
-
झारखंड आणि ओडीशा राज्यातील कामगारांना त्यांच्या घरी पोहचवण्यासाठी १०० वी श्रमिक एक्सप्रेस पुणे स्थानकातून सुटली. ज्यातून ६८२ कामगार आपापल्या घरी परतले.
-
सरकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या अखेरच्या गाडीमधून घरी जाण्यासाठी सुमारे १०२६ कामगारांनी आपली नावं नोंदवली होती. मात्र प्रत्यक्षात ६८२ कामगार हजर राहिले.
-
आतापर्यंत पुण्यामधून १.२६ लाख कामगारांनी स्थलांतर केल्याची माहिती डेप्युटी कलेक्टर सुभाष भागडे यांनी दिली.
-
या सर्व कामगारांनी गाडी सुटण्याआधी पुणे रेल्वे स्थानकाबाहेर गर्दी केली होती.
-
सर्वांना सोशल डिस्टन्सिंगचं नियम पाळणं बंधनकारक करण्यात आलं होतं.
-
गेल्या दोन महिन्यांपेक्षा जास्त काळ रोजगाराविना राहिल्यानंतर आता फक्त घरी जाणं हीच या कामगारांची इच्छा आहे.
-
उन-पावसाचा खेळ सुरु असल्यामुळे प्रत्येक कामगाराने आपपल्यापरीने स्वतःचं आणि सामानाचं रक्षण करण्यासाठी सोय केली होती.

बुध ग्रहाचं गुरु राशीत संक्रमण; पुढचे २५ दिवस ‘या’ ३ राशींच्या आयुष्यात येणार प्रचंड पैसा, पिढ्यान पिढ्या होणार समृद्ध